इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ने आज मोठा इतिहास रचला आहे. एकाचवेळी तब्बल ३६ उपग्रह अंतराळात यशस्वीरित्या पाठविण्याचा विक्रम इस्रोने केला आहे. यामुळे इस्रोसह भारताची जगभरातच वाहवा होत आहे. असा प्रकारचे कर्तृत्व गाजविणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत जाऊन पोहचला आहे.
इस्रोच्या सहकार्याने OneWeb या लो-अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनीने आज ३६ उपग्रहांचे एकाचवेळी यशस्वी प्रक्षेपण केले. हा स्वतःच एक विक्रम आहे. इस्रोने शनिवारी सांगितले की, OneWeb India-2 मिशनद्वारे ३६ उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी उलट गणती सुरू झाली होती
https://twitter.com/isro/status/1639855200684118017?s=20
आज, सकाळी ९ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. विशेष म्हणजे, ६४३ टन वजनाचे आणि ४३.५ मीटर लांब हे प्रक्षेपण वाहन होते. इस्रोचे हे सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन आहे. ज्याने चांद्रयान-२ मोहिमेसह आतापर्यंत पाच यशस्वी उड्डाणे पूर्ण केली आहेत. या ३६ उपग्रहांचे वजन ५८०५ टन एवढे आहे.
इस्रोने माहिती दिली की सध्याचे LVM3-M3 हे न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) चे दुसरे समर्पित व्यावसायिक उपग्रह मिशन आहे, जे त्यांच्या क्लायंट ब्रिटीश कंपनी M/s Network Access Associates Limited (M/s OneWeb) साठी चालवले जात आहे. LVM-3 हे इस्रोच्या सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन GSLVMK-3 चे नवीन नाव आहे. ज्यामध्ये सर्वात वजनदार उपग्रह निश्चित कक्षेत सोडण्याची क्षमता आहे.
https://twitter.com/airnewsalerts/status/1639833733405745152?s=20
वनवेब सॅटेलाइट ही ब्रिटनमधील कम्युनिकेशन कंपनी आहे. ब्रिटन सरकारसह, भारताचे भारतीय उपक्रम, फ्रान्सचे युटेलसॅट, जपानचे सॉफ्टबँक, अमेरिकेचे ह्यू नेटवर्क्स आणि दक्षिण कोरियाचे हानव्हा हे प्रमुख भागीदार आहेत. त्याचे मुख्यालय लंडन येथे आहे. जगभरात चांगली ब्रॉडबँड सेवा देणे हे या कंपनीचे उद्दिष्ट आहे.
OneWeb ने ISRO सोबत एक करार केला आहे, ज्या अंतर्गत २६ मार्च रोजी ३ उपग्रह पृथ्वीच्या कमी कक्षेत ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षीही इस्रोने कंपनीचे ३६ उपग्रह स्थापित केले होते. एकूण ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी करार करण्यात आला आहे. यासाठी एकूण एक हजार कोटी रुपयांहून अधिक प्रक्षेपण शुल्क आकारले जात आहे. हा इस्रोचा सर्वात मोठा करार आहे.
https://twitter.com/OneWeb/status/1639833260820660224?s=20
Record Isro Successfully Launch 36 Satellites Today