नाशिक – जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षातील विक्रम नांदगाव तालुक्याने मोडले आहेत. नांदगाव तालुक्यात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात सरासरी ४९१ मिलीमीटर पावसाची नोंद होते. यंदा मात्र आतापर्यंत तब्बल ८०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी दिवसभरात तर ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे लेंडी नदीसह अन्य नाल्यांना पूर आला आहे. विशेष म्हणजे, पेठ आणि सुरगाणा सारख्या पावसाचे माहेरघर असलेल्या तालुक्यांमध्ये ८० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद होते. मात्र, यंदा नांदगाव तालुक्यावर पावसाची मोठी कृपा असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील मंगळवारची (२२ सप्टेंबर) पावसाची आकडेवारी अशी