मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सत्ता ही चंचल असते. ती एका जागी कधीही स्थिर राहत नाही. तर राजकारणात विश्वास हा अदृश्य असतो तर दुसरीकडे अविश्वास हा ठायी ठायी दिसतो, असेही सांगितले जाते. याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व जनतेला येत आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय भूकंप कथा सत्तांतर नाट्य आता वेगळेच वळण घेतले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये जाऊन बसले आहे. अशा प्रकारचे हे बंडखोरांचे हॉटेल राजकारण काही पहिल्यांदाच होत नाहीय. त्याचा असा रंजक इतिहास आहे.
जून २०२२:
राज्यसभा निवडणुकीतही रिसॉर्ट राजकारणाचा अवलंब करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत राजस्थानमधील काँग्रेसच्या ७० आमदारांना उदयपूर येथील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. याचा फायदा काँग्रेसलाही झाला. या निवडणुकीच्या निकालात राजस्थानमधील चारपैकी तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला, त्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी “लोकशाहीचा विजय” असे वर्णन केले.
जुलै २०२०:
राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर संकट असताना, पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांना राज्यातील फेअरमॉन्ट हॉटेलमध्ये ठेऊन घेतले होते. पायलटला पाठिंबा देणारे आमदार स्वतः दिल्लीत होते आणि नंतर भाजपशासित राज्यातील एका रिसॉर्टमध्ये गेले. मात्र, शेवटी सरकार पडले नाही आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री राहिले. मात्र सध्या सचिन पायलटचे नुकसान झाले असून त्यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले आहे.
मार्च २०२०:
मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आमदारांना भाजपशासित राज्यातील बेंगळुरूमधील प्रेस्टीज गोल्फ क्लबमध्ये नेण्यात आले. यापूर्वी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही पक्ष सोडला होता. त्यांच्या पाठिंब्याने शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, नंतर सिंधिया भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. आता ते केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत.
२०००:
बिहार विधानसभा अध्यक्षांनी बहुमत नसतानाही नितीश कुमार यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला, तरी नितीश कुमार यांना राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलावले होते. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि आरजेडी या विरोधी पक्षांनी त्यांच्या काही सदस्यांना पाटण्यातील हॉटेलमध्ये पाठवले होते. मात्र, विश्वासदर्शक ठरावापूर्वी नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि आरजेडीच्या राबडी देवी बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या.
१९८४:
आंध्र प्रदेशातही राज्याचे अर्थमंत्री भास्कर राव यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री एनटीआर यांचे सरकार पाडले. तेव्हा चित्रपट सुपरस्टार-राजकारणी बनलेले एनटीआर देशाबाहेर होते आणि राज्यपालांनी भास्कर राव यांना मुख्यमंत्री केले. त्यावेळी एनटीआरने जवळपास १६० आमदारांना सर्व सुविधांसह स्टुडिओत ठेवले होते. मात्र, भास्कर राव यांना बहुमत सिद्ध करता आले नाही आणि त्यांचे सरकार पडले. त्यानंतर एनटीआर पुन्हा सत्तेत आले.
१९९५ः
एनटीआरचे जावई एन चंद्राबाबू नायडू यांना एनटीआरला आंध्र प्रदेशातून पक्षातून काढून टाकायचे होते. टीडीपीला सांभाळण्यासाठी अशा एनटीआर निष्ठावंतांना हैदराबादच्या व्हाइसरॉय हॉटेलमध्ये पाठवण्यात आले.
rebel politics in india interesting history maharashtra political crisis