इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिवसेनेतून बंडखोरी करणारे आमदार आसामच्या गुवाहाटी येथील पंचतारांकीत हॉटेलमधून निघाले आहेत. तीन लक्झरी बसमधून विमानतळाकडे निघाले आहेत. या सर्व जणांना घेण्यासाठी विशेष विमान सज्ज आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० पेक्षा अधिक आमदार गुवाहाटीत गेल्या आठ दिवसांपासून निवासी होते. राज्याच्या विधीमंडळाचे विशेष अधिवेशन उद्या होत आहे. त्यासाठी हे सर्व जण हॉटेलबाहेर पडले आहेत. उद्याच्या बहुमत चाचणीसाठी हे सर्व जण विधिमंडळात हजर राहणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व बंडखोर आमदार थेट मुंबईला आज येणार नसल्याचे समजते. हे सर्व जण गोवा येथील हॉटेल ताजमध्ये आज पोहचणार आहेत. तेथून हे सर्व जण उद्या सकाळी निघून विधीमंडळात सकाळी ११ वाजता हजर राहणार आहेत. भाजपच्यावतीने या बंडखोरांची सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1542107275669540865?s=20&t=xG06NypuWA5URd-mXcCZMw
Rebel MLAs Leave from Guwahati Hotel Maharashtra Political Crisis