नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अखेर मोठा निर्णय घेतला आहे. आज त्याचा उलगडा झाला आहे. १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या नोटिशीविरोधात या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच याचिकेच्या अंतर्गत शिंदे गटाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केली आहे. या प्रतिज्ञापत्रात शिंदे गटाने नमूद केले आहे की, महाविकास आघाडी सरकारने त्यांचे बहुमत गमावले आहे. कारण, शिवसेनेचे ३८ आमदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे गेल्या आठवड्याभरापासून राज्याच्या राजकारणातील अनिश्चितता आणि नाट्यातील मोठा खुलासा झाला आहे.
https://twitter.com/ANI/status/1541312726856740864?s=20&t=oNWBW5Xu-fSZnZejnjz2wg