मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दीड दोन महिन्यांपासून राज्यात मोठा सत्ता संघर्ष सुरू आहे. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनेतील वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. शिंदेंनी संपूर्ण शिवसेना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असतानाच एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ती म्हणजे ठाकरे कुटुंबियांबाबत शिंदेंनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे.
शिवसेनेच्या या दोन्ही गटांमध्ये प्रचंड संघर्ष सुरू आहे. त्यातच आरोप प्रत्यारोप आणि राजकीय चढाओढ दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर हे प्रकरण थेट निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आहे, अशा प्रकारे दोन्ही गटांकडून आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच शिंदे यांनी मूळ शिवसेनेबाबत विशेषतः ठाकरे कुटुंबीयांबाबत काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारले आहे, असे दिसून येते.
एक महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण या सगळ्या घडामोडीत शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. वेळप्रसंगी गंभीर आरोप केले. तर दुसरीकडे शिवसेनेची ओळख असणाऱ्या धनुष्यबाण चिन्हावरही शिंदे गटाने दावा केला. पण आता त्यांची भूमिका मवाळ व्हायला लागली आहे, असे दिसून येत आहे. कारण, ठाकरे कुटुंबियांबाबत आक्रमक भूमिका घेऊ नका, थोडं सबुरीनं घ्या, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिल्या आहेत.
एकीकडे मुख्यमंत्री शिंदे आमदार आराम करीत असताना दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिल्या आहेत. जरा मवाळ भूमिका घेण्याच्या सूचना शिंदेनी दिल्या आहेत “ठाकरे कुटुंबियांबाबत आक्रमक भूमिका घेऊ नका, थोडं सबुरीनं घ्या”, अश्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या गटातील आमदारांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विनाकारण ठाकरेंवर टीका करू नका, असेही शिंदे म्हणाले.
सामनाच्या आजच्या अग्रलेखात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शुभचिंतन व्यक्त करण्यात आले. सध्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक व्हावी आणि त्यांना बळ मिळो! अश्या शीर्षकाखाली आजचा आजचा अग्रलेख प्रसिद्ध झालाय. “शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो!”, असेही यात म्हटले आहे.
या शिवाय सर्वोच्च न्यायालयीन सुनावणीचा दाखला देत ‘धनुष्य बाण’ आमच्याकडेच राहणार, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. सध्या संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक झाल्यानंतर सामनाच्या संपादकपदाची धुरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली. कालच त्यांनी ही जबाबदारी स्विकारली. त्यानंतर आज पहिला अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शुभचिंतन व्यक्त करण्यात आले आहे.
सध्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक व्हावी आणि त्यांना बळ मिळो! अशा शीर्षकाखाली आजचा आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. नवे सरकार अस्तित्वात येऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? मंत्रिमंडळात भाजप आणि शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेल्या शिवसैनिकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती . ठाण्यातील आनंद आश्रम परिसरात संबंधित प्रकार घडला आहे. शिवसैनिक आणि पोलीस यांच्यातील बाचाबाचीमुळे परिसरात तणावाचं वातावरण होते.
Rebel Leader Eknath Shinde Big Decision for Thackeray Family
Maharashtra Political Crisis Shivsena Uddhav Thackeray