नवी दिल्ली – Realme X7 pro 5G फोन आज प्रथमच बाजारात उपलब्ध होणार आहे. दुपारी बारा वाजेपासून ई कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून तो खरेदी केला जाऊ शकतो. याची किंमत २९,९९९ रुपये असून, फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची क्षमता आहे. Mystic Blank, Fantasy या दोन रंगामध्ये फोन उपलब्ध असेल. ICICI आणि Axis बँकेच्या क्रेडिटकार्डवर फोनखरेदीसाठी मोठी सवलत मिळणार आहे. Realme कंपनीकडून Realme Upgrade योजना सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना २९,९९९ रुपयांचा Realme X7 pro 5G फोन ९००० रुपयांच्या सवलतीवर २०,९९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहे.
Flipkart Upgrade योजना काय आहे
Flipkart Upgrade योजनेअंतर्गत या फोन खरेदीवर ग्राहकांना फक्त ७० टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. याचाच अर्थ याची किंमत २९,९९९ रुपयांऐवजी २०,९९९ रुपये असेल. तसंच Flipkart वरून फोन खरेदी करण्यावर १,५०० रुपयांची अतिरिक्त सवलत मिळणार आहे. फोनची ७० टक्के रक्कम सहा महिन्यात बिनव्याजी कर्जावर फेडण्याची मुभा आहे. Realme Upgrade योजनेला Realme X7 pro च्या पहिल्या विक्रीदरम्यान ११ रुपये सब्सक्रिप्शन शुल्क भरून सुरू केली जाईल.
फोन खरेदी केल्याच्या एक वर्षानंतर…
ग्राहक Realme X7 pro 5G फोन ७० टक्के रक्कम भरून खरेदी करू शकतील. जेव्हा Realme X सीरिजचा नवा स्मार्टफोन लॉन्च होईल, तेव्हा ग्राहक Realme X7 pro 5G फोनला परत करून नवा फोन खरेदी करू शकतील. यासाठी ग्राहकांना पुन्हा ७० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. जर ग्राहकांना Realme X7 pro 5G फोनचा वापरणार असतील तर त्यांना ३० टक्के रक्कम द्यावी लागेल.