इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तंत्रज्ञान ब्रँड असलेल्या रियलमीने त्याच्या वापरकर्त्यांच्या अखंड आणि सरल एंड-टू-एंड कस्टमर सपोर्टसाठी रियलमी केअर सेवा प्रणाली (रियलमी केअर सर्व्हिस सिस्टम) सुरु केली आहे. ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले अनुभव त्यांना प्रदान करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करून या लॉंचसह ब्रँडने त्याच्या वृद्धीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश झाला आहे.
रियलमीचे भारतातील ७० दशलक्ष+ वापरकर्ते आता व्हॉट्सअँपपासून ते सोशल मीडिया आणि देशभरातील १०००+ सेवा केंद्रांमार्फत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही टच-पॉइंट्सच्या माध्यमातून ग्राहक सेवांचा लाभ मिळवू शकतात.रियलमी ग्राहक उच्च दर्जाच्या सेवांच्या माध्यमातून ग्राहक सेवा अनुभव आणि ग्राहक समाधानात सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. रिअलमीची अपडेटेड सेवा प्रणाली म्हणून रियलमी केअर “ग्राहक-केंद्रीत्व” या संकल्पनेला अधिक भक्कम करते.
डबल सेन्टर्स, डबल लाइन, डबल हमी आणि डिजिटल ग्राहक सेवा प्लॅटफॉर्मच्या ४ डी अपग्रेडयुक्त सुविधेच्या माध्यमातून वापरकर्ते आता अधिक तर्कसंगत, सोयीस्कर, कार्यक्षम आणि वैयक्तिकृत सेवा प्रणालीच्या माध्यमातून अतिरिक्त अनुभव घेऊ शकतात.रियलमीने रियलमी केअर+ची देखील घोषणा केली आहे, जी रु. ४८९ च्या स्वस्त दरात उपलब्ध आहे. ही विशेषाधिकार योजना ग्राहकांना १ वर्षाची विस्तारित वॉरंटी, १ वर्षाचे स्क्रीम प्रोटेक्शन आणि १ वर्षाच्या अपघाती आणि लिक्वीड प्रोटेक्शनसह एकापेक्षा जास्त पॅकेजेसद्वारे संपूर्ण मोबाइल संरक्षण सेवांचा लाभ घेऊ देते. रियलमी केअर+च्या सदस्यांना रियलमीचे विश्वसनीय तज्ज्ञ, त्रास-मुक्त क्लेम प्रोसेस, खरे डिव्हाईस पार्ट्स उपलब्ध असलेल्या अधिकृत सेवा केंद्राचा लाभ घेता येईल. रियलमी केअर+ विद्यमान आणि नवीन अशा दोन्ही वापरकर्त्यांसाठी रियलमी डॉट कॉमसह ऑफलाइन चॅनेल्सवर आणि ऑनलाइन उपलब्ध आहे.
सेवा केंद्रासह टेक्निकल सपोर्ट सेंटर असलेले डबल सेन्टर्स जलद आणि अधिक प्रोफेशनल मेंटेनन्स करण्यास मदत करतील डबल लाइन्स या प्रगत ऑनलाइन आणि ऑफलाइन सेवा आहेत, ज्या वापरकर्त्याचा अनुभव आणखी वाढवतील. वापरकर्ते आता सकाळी ९ ते रात्री ९वाजेपर्यंत सोशल मीडिया, ईमेल, व्हॉईस, व्हॉट्सअॅप आणि वेब चॅटच्या माध्यमातून रियलमी ग्राहक सेवांशी संपर्क साधू शकतात. व्हॉईस सर्व्हिस आता तामिळ, तेलगू, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, पंजाबी, हिंदी यासह ९ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
रियलमी इंडियाचे सीईओ, रियलमीचे व्हीपी आणि रियलमी इंटरनॅशनल बिझनेस ग्रुपचे अध्यक्ष माधव शेठ म्हणाले की रियलमी केअर हे आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची आणि ग्राहकांच्या अनुभवात आणखी वाढ करण्याच्या आमच्या प्रयत्नांची साक्ष आहे.या उपक्रमाद्वारे आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे ‘सेवा गुणवत्ता’ या पाया आणि ‘सुसंगतता, सुविधा आणि काळजी’ या मूलभूत मूल्यांसह संपूर्ण सेवा प्रदान करण्याचे सुनिश्चित करत आहोत. आम्हाला आशा आहे, की रियलमीची ही सेवा तंत्रज्ञान उद्योगातील ग्राहक अनुभवासाठी एक बेंचमार्क ठरेल.
Realme Support Care Service System Launch
Technology Mobile