मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रियलमी या वेगवान स्मार्टफोन ब्रँडने, आज त्याच्या नार्झो कुटुंबात – रियलमी नार्झो ५० मध्ये एक नवीन उत्पादन सादर केले आहे. सर्वात नवीन जोड, रियलमी नार्झो ५०, एक ‘माईटी परफॉर्मन्स बूस्टर’ स्मार्टफोन हा गेमिंग प्रेमींना आपल्या सर्वोत्कृष्ट प्रोसेसर, जबरदस्त डिस्प्ले, जलद चार्जिंग क्षमता आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरीमुळे खुश करून टाकणार आहे.
सेगमेंटमधील सर्वोत्कृष्ट गेमिंग प्रोसेसर असलेले, रियलमी नार्झो ५०, मीडियाटेक हेलीयो जी ९६ द्वारे समर्थित आहे, दोन कॉर्टेक्स-ए ७६ कोर आणि सहा कॉर्टेक्स-ए ५५ कोर २.०५जीएचझेड क्लॉक स्पीडसह उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणते. हे अल्ट्रा-स्मूथ १२० हर्ड्स रिफ्रेश रेटसह १८०हर्ड्स च्या टच सॅम्पलिंग रेटसह ६. ६-इंच डिस्प्लेसह येते, जे तरुण खेळाडूंना सर्वात स्मूथ डिस्प्ले ऑफर करते. हा स्मार्टफोन ५०००एमएएच क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज आहे जो ३३ वॉट डार्ट चार्जिंगसह ७० मिनिटांत १०० टक्के चार्ज होऊ शकतो. रियलमी नार्झो ५० मध्ये ५० एमपी एआय ट्रिपल कॅमेरा सुसज्ज आहे, तो दिवसाही रात्रीच्या शॉट्ससाठी उत्कृष्ट इमेज क्वालिटी कॅप्चर करतो आणि उत्कृष्ट डिटेलिंग देतो.
यामध्ये एक प्राथमिक कॅमेरा आहे जो मोठ्या क्षेत्रासह ५० एमपी इमेज सेन्सरचा अवलंब करतो, जो पुरेसा प्रकाश देतो आणि चित्रे अधिक स्पष्ट आणि उजळ करतो. युझर्सना पूर्ण डिटेल्स शकत उत्तम मॅक्रो फोटोग्राफी करता यावी, म्हणून ह्यात एक मॅक्रो लेन्स आहे ज्यात सुपर क्लोज फोकस करता येते. ह्यामध्ये केव्हीलर स्पीड टेक्स्चर डिझाईन आहे, जे रेसिंग कार्स पासून प्रेरणा घेते. त्याचे वजन फक्त १९४ ग्राम आहे. अतिशय हलके, फक्त ८. ५ एमएम रुंद, आणि एक उल्टरफ़ास्ट सैद फिंगरप्रिंट ज्यामुळे पॉवर बटन आणि फिंगरप्रिंट स्कॅनर तू इन वन प्रकारे वापरता येतो. रियलमी नार्झो -५० दोन स्टायलिश रंगांमध्ये उपलब्ध असेल- स्पीड ब्लॅक आणि स्पीड ब्लू, आणि ४ जीबी आणि ६४ जीबी च्या दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये रु १२,९९९ आणि ६ जीबी १२८ जीबी ची किंमत रु १५,४९९ आहे. रियलमी नार्झो ५० ची पहिली विक्री ३ मार्च, १२ वाजता होणार आहे.
रियलमी इंडियाचे व्हीपी, रियलमी आणि अध्यक्ष, रियलमी इंटरनॅशनल बिझनेस ग्रुपचे अध्यक्ष माधव शेठ म्हणाले की रियलमी नार्झो ही मालिका संपूर्ण परफॉर्मन्स-ओरिएंटेड स्मार्टफोन आहे आणि आतापर्यंत आम्हाला युझर्सकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आज, नार्झोने ७ दशलक्ष मजबूत युझर बेस तयार केला आहे आणि आश्चर्यकारक वैशिष्ट्यांसह लाखो महत्त्वाकांक्षी स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आमचे आकर्षण आणखी वाढवेल. आमचे कायम ध्येय राहिले आहे, की आम्ही पॉवर, परफॉर्मन्स आणि भरपूर मजा येईल, असे उत्पादन आमच्या गेमर्स साठी कायम आणत असतो. आमची अनेक खास वैशिष्ट्ये असतात.