ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधुनिक काळात मोबाईलचा प्रचंड प्रमाणात वापर वाढला असून अनेक कंपन्यांचे नवनवीन आणि आकर्षक स्मार्टफोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यात रियलमी कंपनीने बाजी मारलेली दिसून येते, कारण त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत Realme 9 5G आणि Realme 9 5G स्पीड एडिशन, Realme 9 मालिकेतील दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. Realme 9 5G ला MediaTek डायमेंशन 810G प्रोसेसर सपोर्ट सह सादर करण्यात आला आहे. Realme 9 5G स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. तर फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. Relme 9 5G स्मार्टफोन 5000mAh बॅटरी सपोर्टसह येईल. यात 18W डार्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. तसेच Realme 9 5G स्मार्टफोन 5 GB डायनॅमिक रॅम आधुनिक तंत्रज्ञान (DRE) सह देण्यात येईल.
Realme 9 5G दोन रंग पर्याय व्हाईट आणि मेटियर ब्लॅक आणि दोन स्टोरेज प्रकारांमध्ये सादर केले गेले आहे. फोनच्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,499 रुपये असेल. फोनची विक्री 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन फ्लिपकार्ट आणि मेनलाइन चॅनलवरून खरेदी करता येईल.
Realme 9 5G स्पीड एडिशन स्नॅपड्रॅगन 778G 5G चिपसेट सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. हा फोन 6.6 इंच फुल एचडी प्लस सपोर्टसह येईल. Realme 9 5G स्पीड एडिशनमध्ये 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. हे नाईटस्केप कॅमेरा सेटअप आणि DRE सपोर्टसह सादर केले गेले आहे. फोनमध्ये 5 GB DRE तंत्रज्ञान देण्यात आले आहे. फोन 5000mAh बॅटरी सपोर्टसह येईल. त्याला 30W डार्टचार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.
6GB रॅम 128GB – 19,999 रुपये तर 8 जीबी रॅम 128 जीबी – 22,999 रुपये किमतीचा असून हा फोन स्टाररी ग्लो आणि अझूर ग्लो या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. फोनची विक्री 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन फ्लिपकार्ट आणि मेनलाइन चॅनलवरून खरेदी करता येईल.
Realme Buds N100 ला 17 तासांची बॅटरी लाइफ मिळेल. यात चुंबकीय ब्लूटूथ कनेक्शनसह त्वरित ब्लूटूथ 5.2 कनेक्टिव्हिटी आहे. हा सिलिकॉन नेकबँड ग्रे आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. त्याची किंमत 1,299 रुपये आहे. त्याची विक्री 15 मार्च पासून सुरू होणार आहे.
Realme Watch S100 स्मार्टवॉच 1.69 इंच डिस्प्लेमध्ये येईल. यात 110 स्टायलिश घड्याळाचे चेहरे मिळतील. ज्यामध्ये 12 तासांची बॅटरी लाइफ मिळेल. वॉच S100 IP68 सर्टिफिकेशनसह येईल. यात 24 स्पोर्ट मोड आहेत. तो ग्रे आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. त्याची विक्री दि. 14 मार्चपासून सुरू होणार आहे.