इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात बाजारात स्मार्टफोनचे अनेक पर्याय उपलब्ध असून, आता आणखी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. Realme C31 कंपनीचा नवा आणि स्वस्त सी-सिरिजच्या स्मार्टफोन सेलचा शुभारंभ आज दुपारी बारा वाजेपासून सुरू झाला आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच एलसीडी डिस्प्ले असून, यामध्ये १३ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसुद्धा आहे.
Realme C31 स्मार्टफोन Android 11 आधारित Realme R UI वर काम करतो. तसेच फोनच्या बॅटरीची क्षमता 5,000 mAh इतकी आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन रियलमीच्या ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल चॅनल्सवर खरेदी केला जाऊ शकणार आहे. हा फोन तुम्ही किती स्वस्त किमतीत खरेदी करू शकता हे जाणून घेऊया.
भारतात Realme C31 या स्मार्टफोनची किंमत किमान ९,९९९ रुपयांपासून सुरू होते. 3GB+32GB स्टोअरेज मॉडेलची किंमत ८,९९९ रुपये, तर 4GB+64GB व्हेरिएंट ९,९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. डार्क ग्रीन आणि लाइट सिल्व्हर रंगामध्ये स्मार्टफोन उपलब्ध असेल.
स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही एचडीएफसी बँकेचे डेबिड, क्रेडिट कार्ड आणि ईजीएमआय आणि एसबीआय कार्डचा वापर करू शकणार आहात. त्याद्वारे तुम्हाला रियलमी Realme C31 च्या 4GB+64GB व्हेरिएंटवर ५०० रुपयांची सवलत, 3GB+32GB व्हेरिएंटवर एक हजार रुपयांची तत्काळ सवलत मिळणार आहे. तसेच २४ महिन्यांच्या ईएमआयवर ४३३ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
हँडसेटमध्ये ६.५ इंचचा एचडी+(720*1, 600 Pixel) चा एलसीडी डिस्प्ले आहे. Realme C31 हा 12nm Unisoc T612 प्रोसेसरद्वारे काम करतो. यामध्ये 4GB पर्यंतची रॅम उपलब्ध असेल.
Realme C31 फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये f/2.2 अपर्चर लेन्स आणि 4* डिजिटल झूमसह १३ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, २ मेगापिक्सलचा सूक्ष्म कॅमेरा आणि एक मोनोक्रोम सेंसर लावण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी हँडसेटमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
Realme C31 मध्ये 5,000 mAh क्षमतेची बॅटरी असून, बॅटरीची लाइफ ४५ दिवसांची असल्याचा दावा करण्यात आला आहे. Realme C31 वर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, वाय-फाय (2.4 GHz), v5 ब्लूटूथ, ३.५ मिमिचा हेडफोन जॅक आणि एका यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.