विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सध्याच्या काळात अनेक कंपनीचे विविध अत्याधुनिक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होत आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये या फोन बद्दल तरुणांमध्ये विशेष क्रेझ दिसून येते. त्यातच रिअलमीने जगातील पहिला MediaTek Dimensity 810 प्रोसेसर स्मार्टफोन Realme 8s लाँच केला आहे. या फोनची आज १३ सप्टेंबर रोजी भारतात पहिली विक्री होणार आहे. तसेच या फोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसारखी वैशिष्ट्ये आहेत.
रिअलमी 8s ची किंमत आणि ऑफर : रिअलमी 8s स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये येतो – 6GB RAM प्लस 128GB स्टोरेज आणि 8GB RAM प्लस 128GB स्टोरेज असे आहेत, यात 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे, तर हाय-एंड 8GB मॉडेलची किंमत १९,९९९ रुपये आहे. हे फोन युनिव्हर्स पर्पल आणि युनिव्हर्स ब्लू कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असतील, तसेच लॉन्च ऑफर म्हणून, Realme 8s वर त्वरित सूट देखील दिली जात आहे. ICICI बँक क्रेडिट किंवा क्रेडिट EMI व्यवहार आणि HDFC बँक क्रेडिट/डेबिट कार्डवर ग्राहक १५०० रुपयांची सूट मिळवू शकतात. म्हणजेच, आपण बेस व्हेरिएंट १५,४९९ रुपयांना खरेदी करू शकता.
रिअलमी 8s 5G ची वैशिष्ट्ये : सदर फोन हा Android 11 आधारित Realme UI 2.0 वर कार्य करतो. हा स्मार्टफोन 6.5-इंच फुल-एचडी प्लस (1080 x 2400 पिक्सेल) डिस्प्ले दर्शवितो, जो 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात येतो. सुरक्षेसाठी यात साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. हा फोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह देण्यात येतो. सदर फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी स्लॉटद्वारे 1 टीबी पर्यंत वाढवता येते. तसेच त्याला 5GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. मागील कॅमेरामध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 2-मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी समोर 16 एमपी कॅमेरा सेन्सर आहे. याशिवाय 5,000 mAh ची बॅटरी उपलब्ध असून ते 33W डार्ट चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 AC, Bluetooth v5.1, GPS / A-GPS आणि USB Type-C पोर्ट चार्जिंगसाठी समाविष्ट आहे.