मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रियलमीने रियलमी जीटी २ प्रो सादर प्रो हा आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ही ४९,९९९ रुपये आहे. २के सुपर रिअॅलिटी डिस्प्ले, पेपर टेक मास्टर डिझाइन, स्नॅपड्रॅगन ८ जेन प्रोसेसर, ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, ५० एमपी सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे, तर डेप्थ सेन्सर हा २ एमपीचा आहे. जोडीला या स्मार्टफोनमध्ये ३२ एमपी सेल्फी कॅमेरा सुद्धा आहे.
तसेच या स्मार्टफोनच्या डिस्प्ले हा ६.७ इंचाचा आहे. रियलमी जीटी २ प्रोला थंड ठेवण्यासाठी ९ लेयर कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे. जोडीला हा स्मार्टफोन १० गिगाबाइट ५ जी कनेक्टिव्हिटीसह येतो. तसेच विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा वाइड बँड हायपर स्मार्ट अँटेना स्विचिंग आहे, ज्यामुळे स्मार्टफोनच्या सिग्नल सुधारतो व यामुळे फोन कॉल आणि इंटरनेट वापरताना काही समस्या निर्माण होत नाही. रियलमी २ जीटी प्रो हा १४ एप्रिल २०२२ पासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. फ्लिपकार्ट डॉट कॉम, रिअलमी डॉट कॉम आणि अन्य मेनलाइन विक्री चॅनेलवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.
तसेच रियलमीने रियलमी ९ हा ही दुसरा स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोन मध्ये १०८ एमपी प्रोलाइट कॅमेरा पॉवर परफॉर्मर आहे. तर हा सॅमसंग आयसोसेल एच एम ६ इमेज सेन्सर असणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. रियलमी ९ हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० ने द्वारे समर्थित आहे. ५ जीबी डीआरई पर्यंत,५००० एमएएच मेगा बॅटरी, ३३ डब्ल्यू डार्ट चार्ज तंत्रज्ञान या सुविधा या स्मार्टफोन मध्ये आहेत. रियलमी ९ च्या ६ जीबी, १२८ जीबी या मॉडेलची किंमत १७,९९९ इतकी आहे. तर ८ जीबी, १२८ जीबी या मॉडेलची किंमत १८, ९९९ इतकी आहे. हा स्मार्टफोन १२ एप्रिलपासून फ्लिपकार्ट डॉट कॉम , रिअलमी डॉट कॉम आणि अन्य मेनलाइन विक्रीचॅनेलवर दुपारी १२ वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल.
जोडीला कंपनीने रियलमी बड्स एअर ३, रियलमी बुक प्राइम, रियलमी स्मार्ट टीव्ही स्टिक ही ही उत्पादने भारतीय बाजारपेठेतही सादर केली आहेत. ही उत्पादने पण फ्लिपकार्ट डॉट कॉम , रिअलमी डॉट कॉम आणि अन्य मेनलाइन विक्रीचॅनेलवर ग्राहकांनासाठी उपलब्ध असतील.