मुंबई – चीनी स्मार्टफोन कंरनी रिअलमीच्या दोन जबरदस्त स्मार्टफोनचे लॉन्चिंग आज होणार आहे. दुपारी १२.३० च्या सुमारास हे लॉन्चिंग होईल. Realme X7 5G आणि Realme X7 Pro 5G या दोन फोनचा यात समावेश असून हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर बघता येणार आहे.
Realme X7 ला भारतात दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात येत आहे. 6GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटला २० हजार रुपये आणि 8GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटला 25,999 रुपयांच्या प्राईस टॅगसह लॉन्च करण्याची शक्यता आगे. दोन्ही फोनमध्ये Dimensity 1000+ 5G प्रोसेसर चा सपोर्ट देण्यात आला आहे. सोबतच 65W SuperDart चार्जिंग चे सपोर्ट आहे.
Realme X7 चे स्पेसिफिकेशन्स
Realme X7 मधील स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे झाले तर या स्मार्टफोनला सुपर एमालेड फुल्ल एचडी डिस्ल्पेसोबत लॉन्च केले जाऊ शकते. यात MediaTek Dimensity 800U प्रोसेसर चा वापर केला जाऊ शकतो. 8GB रॅमसोबत 128GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध असेल. फोटोग्राफी साठी क्वाड रियर कैमरा असेल. 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा वाईड अँगल लेंस, 2MP चा डेप्थ सेंसर और 2MP का मायक्रो लेंस उपलब्ध असेल. फ्रन्ट कॅमरा 32MP चा असेल आणि पॉवर बॅकअप साठी 50W सुपरडार्ट चार्जिंग सपोर्ट सह 4,310mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
Realme X7 Pro के स्पेसिफिकेशन्स
Realme X7 Pro ला MediaTek Dimensity 1000+ प्रोसेसर सोबत लॉन्च केले जाईल आणि यात सुपर एमालेड डिस्प्ले असेल. तो कॉर्निंग गोरिला ग्लास5 ने कोटेड असेल. फोनची बॅटरी 35 मिनीटांत 100 टक्के चार्ज होते.