विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सध्या बाजारात नवनवीन अत्याधुनिक स्मार्ट फोन आले आहेत. आपण जर नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आता आपणासाठी एक उत्तम संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आजपासून ‘रिअलमी डे ‘ हा सेल सुरू झाला आहे. विशेष म्हणजे दि. १३ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये रिअॅलिटीचे लोकप्रिय स्मार्टफोन सर्वोत्तम ऑफर्स आणि ८ हजार रुपयांपर्यंत सूटसह खरेदी करू शकता. तर या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम फोनबद्दल जाणून घेऊ या…
रिअलमी x7 प्रो 5G : या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रॅम असून याची किंमत २९,९९९ रुपये आहे. तसेच कंपनीच्या ऑफर अंतर्गत प्रीपेड ऑर्डर केल्यास या फोनवर ८ हजार रुपयांची सूट मिळेल. फोन मध्ये मिळणाऱ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला त्यात ६.५५ -इंच फुल HD प्लस डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
रिअलमी 7 प्रो : या सेलमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन तुम्ही २२,९९९ रुपयांऐवजी १६,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. फोन एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्हाला १५ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त लाभ मिळू शकतो. रिअॅलिटीच्या या फोनमध्ये ६.४ -इंच सुपर AMOLED फुल HD प्लस डिस्प्ले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनच्या मागील बाजूस 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला असून समोर ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
रिअलमी c21: या सेलमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन १०,९९९ रुपयांऐवजी ९,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त, कंपनी डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंटवर ७५० रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे. रिअॅलिटीच्या या बजेट स्मार्टफोनमध्ये ६.५ -इंच HD प्लस डिस्प्ले आहे. तसेच फोटोग्राफीसाठी, कंपनी फोनमध्ये १३-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि ५-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येत आहे.
रिअलमी 8 प्रो : रिअॅलिटीच्या या फोनची प्री-ऑर्डर केल्यावर आपल्याला १ हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. फोनच्या ६ जीबी रॅमची किंमत १७,९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. कंपनी फोनमध्ये ६.४-इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देत आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ -मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.