अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्या टेलिव्हिजनवर वेगवेगळे रिअॅलिटी शो सतत सुरू असतात. आता अमेरिकन रिअॅलिटी शोपासून प्रेरणा घेत ‘शार्क टँक इंडिया’ हा शोही भारतात आणण्यात आला आहे. हा शो २००९पासून अमेरिकेत सुरू आहे. अमेरिकेत या शोचे १३ सीझन झाले आहेत. विशेष म्हणजे, हा शो अजिबात स्क्रिप्टेड नाही. हा शो बड्या उद्योगपतींवर आधारित आहे. या शोमध्ये असे उद्योगपती आहेत, ज्यांनी आपल्या कामाच्या जोरावर जगभरात नाव कमावले आहे. शार्क टँक इंडिया या शोमध्ये सात प्रस्थापित उद्योजक आहेत. ज्यांनी विविध उद्योगांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. या शोची खास गोष्ट म्हणजे यात उद्योजकांना शार्क म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या शोचे नाव शार्क टँक इंडिया आहे. आज आम्ही तुम्हाला या शोच्या सात जज म्हणजेच शार्क टँकबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
अश्नीर ग्रोवर
या शोच्या जजपैकी एक आहे. ते भारत पे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक आहेत. अश्नीर यांनी कोटक बँकेचे उपाध्यक्ष, अमेरिकन एक्सप्रेसमध्ये मुख्य वित्तीय अधिकारी आणि ग्रोफर्समध्ये मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांची एकूण संपत्ती सातशे कोटी रुपये आहे.
अमन गुप्ता
हे प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बोटचे सहसंस्थापक आणि मुख्य विपणन अधिकारी आहेत. अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी 2016 मध्ये कंपनी लाँच केली होती. याशिवाय अमन गुप्ता यांनी फ्रीकल्चर, बमर, स्किप्पी आइस पॉप्स, शिप्रॉकेट, विकेडगुड, अन्वेश आणि दहा क्लबसह अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. अमन गुप्ता यांची एकूण संपत्ती सातशे कोटींच्या आसपास आहे.
पीयूष बन्सल
पीयूष बन्सल हे वयाच्या ३६व्या वर्षी लेन्सकार्टसारख्या मोठ्या कंपनीचे सीईओ आहेत. पियुष बन्सल हे देशातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांनी २०१०मध्ये अमित चौधरी आणि सुमीत कपाही यांच्यासोबत लेन्सकार्ट कंपनी सुरू केली. लेन्सकार्टची स्थापना करण्यापूर्वी बन्सल यांनी अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टमध्ये काम केले. सध्या त्यांची एकूण संपत्ती ६०० कोटी आहे.
अनुपम मित्तल
हे पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ आहेत आणि आता ते भारताच्या ई-कॉमर्स उद्योगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जातात. Shaadi.com ची स्थापना अनुपम यांनी केली होती. या अॅपद्वारे अनेकांना त्यांचा जीवनसाथी मिळाला. याशिवाय, रिपोर्ट्सनुसार, ते ओला कंपनीमध्ये सुमारे दोन टक्के भागधारक आहेत. त्यांची एकूण संपत्ती अनुपम मित्तल यांची अंदाजे एकूण संपत्ती १८५ कोटी आहे.
नमिता थापर
नमिता थापर हे यशस्वी उद्योजकांच्या यादीतील एक प्रमुख नाव आहे. नमिता एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या सीईओ आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यांना द इकॉनॉमिक टाइम्स ४० अंडर फोर्टी अवॉर्ड्स सारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यासोबतच तिचा इकॉनॉमिक टाईम्स २०१७ च्या महिला अहेड लिस्टमध्येही समावेश करण्यात आला आहे.
गझल अलघ
हे ममाअर्थचे सह-संस्थापक आणि मुख्य इनोव्हेशन अधिकारी आहेत. गझलने २०१६ साली या कंपनीची स्थापना केली. हा भारतातील पहिला विषारी केमिकलमुक्त बेबी केअर ब्रँड आहे. त्यांची अंदाजे १४८ कोटींची संपत्ती आहे.
विनिता सिंग
विनिता सिंग या शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ आणि सह-संस्थापक आहेत. त्यांनी कौशिक मुखर्जी यांच्यासोबत जुलै २०१५मध्ये या कंपनीची स्थापना केली. त्यांची एकूण संपत्ती ५९ कोटी एवढी आहे.