मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील आठ प्रमुख शहरांमधील निवासी सदनिकांची विक्री आणि नवीन पुरवठ्यामध्ये एप्रिल-जून २०२३ तिमाहीत अनुक्रमे वार्षिक ८ टक्के व ११ टक्क्यांची वाढ झाली असून यामधून गृहनिर्माण बाजारपेठेची स्थिरता दिसून येत असल्याचे प्रॉपटायगरडॉटकॉमच्या अहवालामधून निदर्शनास आले आहे. २०२३ च्या दुस-या तिमाहीत मुंबईमध्ये नवीन लाँचमध्ये सर्वोच्च वाढ झाल्याचे ही या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आरईचे पाठबळ असलेल्या प्रॉपटायगरडॉटकॉमद्वारे भारतातील अव्वल आठ निवासी बाजारपेठांचे तिमाही विश्लेषण रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – एप्रिल-जून २०२३ अहवालामधून निदर्शनास आले की, २०२३च्या दुसऱ्या तिमाहीत आठ शहरांमध्ये एकूण ८०,२५० सदनिकांची विक्री झाली, तुलनेत गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत ७४,३२० सदनिकांची विक्री झाली होती, ज्यामध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली. अहवालामध्ये कव्हर करण्यात आलेल्या बाजारपेठांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर क्षेत्र, दिल्ली – राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि पुणे आदींचा समावेश आहे.
मुंबई व पुणे शहराला सर्वाधिक पसंती मिळत आहे, जेथे २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत एकूण विक्रीमध्ये या शहरांचा ६० टक्क्यांचा संयोजित हिस्सा होता. निवासी नवीन पुरवठा संदर्भात रिअॅल्टर्सनी ११३,७७० सदनिका लाँच केल्या, ज्यामध्ये २०२२ च्या एप्रिल-जून तिमाहीमधील १०२,१४० सदनिकांच्या तुलनेत ११ टक्क्यांची वाढ झाली. मुंबई नवीन पुरवठ्यासदंर्भात अग्रस्थानी आहे, ज्यानंतर पुणे व अहमदाबाद यांचा क्रमांक आहे.
आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ आणि प्रॉपटायगरडॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख श्री. विकास वाधवान म्हणाले. “भारतातील अव्वल आठ निवासी बाजारपेठांनी जून तिमाहीत विक्रीमध्ये ८ टक्क्यांच्या वाढीसह विकासगती कायम ठेवली आहे. मुख्य कर्जदरात वाढ करणे थांबवण्याच्या आरबीआयच्या निर्णयामुळे निवासी मालमत्ता खरेदीसाठी मजबूत सकारात्मक भावना टिकून राहण्यास मदत झाली.’’
‘‘गेल्या दोन वर्षांत गृहनिर्माण विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी कोविड-प्रभावित कालावधीपासून मागणीमध्ये झालेली वाढ, गृहमालकीहक्कासाठी वाढता कल, महामारीनंतर अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा आणि अधिक एैसपैस घरांसाठी वाढती मागणी प्रमुख कारणीभूत घटक आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की, हा प्रगती ट्रेण्ड कायम राहिल, ज्यामुळे कॅलेंडर वर्ष २०२३ विक्री कामगिरीसंदर्भात गेल्या वर्षापेक्षा उत्तम असेल,’’ असे श्री. वाधवान पुढे म्हणाले.
विकी – तिमाही-ते-तिमाही
शहर २०२३ २०२२ तिमाही-ते-तिमाही वार्षिक
२०२३ ची दुसरी तिमाही २०२३ ची पहिली तिमाही २०२२ ची दुसरी तिमाही
अहमदाबाद…. ८,४५० ७,२५० ७,२४०…. १७ टक्के…. १७ टक्के
बेंगळुरू ….६,७९०…. ७,४४० ८,३५० ….-९ टक्के ….-१९ टक्के
चेन्नई ….३,०५०…. ३,६२०…. ३,२१० ….-१६ टक्के ….-५ टक्के
दिल्ली एनसीआर ….३,२३०…. ३,८१० ….४,५१० -१५ टक्के…. -२८ टक्के
हैदराबाद…. ७,६८० ….१०,२१०…. ७,९१० ….-२५ टक्के ….-३ टक्के
कोलकाता ….१,९४०…. २,२३० ….३,२२० ….-१३ टक्के ….-४० टक्के
मुंबई ….३०,२६० ….३२,३८० ….२६,१६० ….-७ टक्के ….१६ टक्के
पुणे ….१८,८५०…. १८,९२०…. १३,७२० ….० टक्के ….३७ टक्के
भारत…. ८०,२५०…. ८५,८६०…. ७४,३२० ….-७ टक्के ….८ टक्के
स्रोत: रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – एप्रिल-जून २०२३, हाऊसिंग रिसर्च
२०२३ च्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान विक्री झालेल्या १५ टक्के निवासी सदनिकांना रेडी-टू-मूव्ह-इन म्हणून वर्गीकृत करण्यात आले, तर उर्वरित ८५ टक्के निवासी सदनिकांचे बांधकाम सुरू होते. बहुतांश विक्रीमध्ये म्हणजेच २७ टक्के विक्रीमध्ये ४५ ते ७५ लाख रूपये किंमत श्रेणीचा समावेश होता, ज्यानंतर १ कोटी रूपयांहून अधिक किंमत श्रेणीचा क्रमांक होता, ज्याचे एकूण विक्रीमध्ये २५ टक्के योगदान होते. सहामाहीच्या तुलनेत विक्रीमध्ये १५ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ दिसण्यात आली, तर नवीन पुरवठ्यामध्ये ४३ टक्क्यांची मोठी वाढ दिसण्यात आली.
नवीन पुरवठा
शहर…. २०२३ ची दुसरी तिमाही…. २०२३ ची पहिली तिमाही…. २०२२ ची दुसरी तिमाही….तिमाही ते तिमाही…. वार्षिक
अहमदाबाद…. २१,५००…. ८,६६०…. ९,५००…. १४८ टक्के…. १२६ टक्के
बेंगळुरू ….७,९९०…. १२,९९० ….१२,७३० ….-३८ टक्के…. -३७ टक्के
चेन्नई ….४,६४० ….४,८३० ….१,८३० -४ टक्के…. १५४ टक्के
दिल्ली एनसीआर…. ४,२४०…. ५,२००…. २,९७०…. -१८ टक्के…. ४३ टक्के
हैदराबाद ….११,९५०…. १७,९३० ….१६,४८०…. -३३ टक्के ….-२७ टक्के
कोलकाता…. ३,५१०…. २,६८०…. २,०१० ….३१ टक्के…. ७५ टक्के
मुंबई ….३३,३३०…. ६०,०१०…. ४३,२३० ….-४४ टक्के ….-२३ टक्के
पुणे…. २६,६१०…. ३५,४९० ….१३,३९० ….-२५ टक्के ….९९ टक्के
भारत…. ११३,७७०…. १४७,७९०…. १०२,१४०…. -२३ टक्के…. ११ टक्के
स्रोत: रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – एप्रिल-जून २०२३, हाऊसिंग रिसर्च
२०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत सादर करण्यात आलेल्या नवीन निवासी सदनिकांची किंमत ४५ ते ७५ लाख रूपये किंमत श्रेणीमध्ये होती, ज्याचा सर्व सादरीकरणांमध्ये ३३ टक्क्यांचा सर्वोच्च हिस्सा होता. उल्लेखनीय बाब म्हणजे १ कोटी रूपयांहून अधिक किंमत असलेल्या सदनिकांचे एकूण विक्रीमध्ये जवळपास २९ टक्क्यांसह लक्षणीय योगदान होते.