इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वतःच्या मालकीचं घर घेणं हे जवळपास बहुतेकांचं स्वप्न असतं. प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. तुम्हालाही घर घ्यायचं आहे का, तर आम्ही जी माहिती देतो आहोत ती तुमच्यासाठी आहे. सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेकडून लवकरच मोठा ई-लिलाव होणार आहे. हा लिलाव २० जुलै रोजी होणार असून यात १५ हजार प्रॉपर्टीजचा समावेश आहे.
स्वस्तात जमीन, दुकाने आणि घरांची विक्री पंजाब नॅशनल बँक करणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. या लिलावात सहभागी होऊन तुम्ही देखील स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करू शकता. देशातील विविध ठिकाणच्या प्रॉपर्टीची विक्री पंजाब नॅशनल बॅक करणार आहे. ही विक्री ई-लिलावाच्या माध्यमातून होणार आहे. यात रहिवासी घर, व्यवसाइक, शेत जमीन, सरकारी प्रॉपर्टी आणि औद्योगिक प्रॉपर्टीचा समावेश आहे. बँकेच्या या मेगा ई-लिलावात कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. बँकेने ट्विट करत याची माहिती दिली आहे. तसेच वेबसाइटवरही याची माहिती दिली आहे. यानुसार लिलावात ११ हजार ३७४ रहिवासी घरे, २ हजार १५५ दुकाने, ९८ शेत जमीन, ३४ सरकारी आणि ११ बँक प्रॉपर्टी खरेदीसाठी उपलब्ध असतील.
घरं आणि दुकानं स्वस्तात खरेदी करण्याची ही नामी संधी आहे. कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेने हा लिलाव जाहीर केला आहे. ई लिलावाच्या माध्यमातून तुम्ही घर किंवा दुकान खरेदी करू शकता. २० जुलै २०२३ रोजी घर आणि दुकानांचा लिलाव होणार आहे. ही प्रॉपर्टी एनपीए यादीत टाकलेली असते. म्हणजेच प्रॉपर्टीवर कर्ज घेऊन त्या व्यक्तीने त्या रक्कमेची परतफेड केलेली नसते. त्यामुळे बँक अशी प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेते आणि रक्कम वसुलीसाठी लिलाव करते.
काय करावे लागेल?
ई-लिलावात भाग घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत केवायसीची कागदपत्रे दाखवावी लागतील. केवायसी आणि ईएमडीनंतर अर्ज करणाऱ्यास ई-मेल आयडीवर लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल. याचा वापर करून युझर्सला लिलावात भाग घेता येईल.