मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई व पुणे शहरातील प्रिमिअम घरांसाठी २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉम या आघाडीच्या डिजिटल रिअल इस्टेट सल्लागार कंपनीच्या नवीन अहवालामधून निदर्शनास आले आहे. मुंबईत १ कोटी रूपये व त्यावरील तिकिट आकारामधील घरांसाठी मागणीमध्ये २०१९ च्या दुसऱ्या तिमाहीच्या महामारीपूर्वीच्या काळादरम्यान २३ टक्क्यांच्या तुलनेत २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पुणे शहरामध्ये याच किंमत रेंजमधील विक्रीमध्ये याच कालावधीदरम्यान दुप्पट वाढ झाली.
आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख श्री. विकास वाधवान म्हणाले, ” मुंबई व पुणे शहरातील रिअल इस्टेटच्या अद्वितीय वाढीमधून शहरांना दिले जाणारे प्राधान्य आणि शाश्वत गुंतवणूक संधींसाठी त्यांची क्षमता दिसून येते. सकारात्मक दृष्टिकोन व धोरणात्मक नियोजनासह दोन्ही शहरे स्वप्नवत घर खरेदी करण्याची किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना उत्साहवर्धक संधी देतात.”
मुंबई (एमएमआर):
मुंबईमध्ये, निवासी मालमत्तांच्या नवीन पुरवठ्यामध्ये २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीमधील ४३,२३० सदनिकांच्या तुलनेत २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक २३ टक्के घट सह ३३,३३० सदनिकांपर्यंत घट झाली. पण, निवासी मालमत्तांचा नवीन पुरवठा २०२२ च्या पहिल्या सहामाहीमधील ७३,५८० सदनिकांच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये (जानेवारी २०२३ ते जून २०२३) २७ टक्क्यांच्या सहामाही वाढीसह ९३,३३० सदनिकांपर्यंत पोहोचला. बहुतांश नवीन प्रकल्प ठाणे पश्चिम, डोंबिवली व पनवेल या सूक्ष्म बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आले, जेथे ही पेरिफेरल क्षेत्रे मुख्य शहराच्या तुलनेत प्रकाशझोतात आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे लाँच करण्यात आलेले ३१ टक्के सदनिका ४५ ते ७५ लाख रूपये किंमतीच्या श्रेणीमधील आहेत, ज्यानंतर २५ टक्के युनिट्स १ कोटी रूपयांहून अधिक किंमतीच्या श्रेणीमधील आहेत. २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत विक्रीमध्ये वार्षिक १६ टक्क्यांची वाढ झाली आणि २०२२ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या सहामाहीत २७ टक्क्यांची उच्च सहामाही वाढ झाली. मुंबईने राष्ट्रीय विक्री आकडेवारीमध्ये ३८ टक्क्यांच्या सर्वोच्च हिस्स्यासह आपले प्रबळ स्थान कायम राखले. २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये गृहखरेदीदारांसाठी पसंतीचे स्थळ ठाणे पश्चिम, डोंबिवली, पनवेल, वसई व भिवंडी होते. ही क्षेत्रे मुख्य उपनगरांच्या तुलनेत अत्यंत कमी किंमतींमध्ये मुंबईप्रमाणे आर्थिक संधी व शहरी जीवन देतात.
मुंबईचा अव्वल ८ शहरांमध्ये न विक्री झालेल्या ९.४४ लाख सदनिकांमध्ये ३६ टक्के हिस्सा असला तरी इन्व्हेण्टरी ओव्हरहँग २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत ३३ महिन्यांपर्यंत कमी झाली, जी गेल्या वर्षाच्या याच कालावधीसाठी ३८ महिने होती. या घटचे श्रेय विक्रीमधील स्थिर वाढीला जाते.
पुणे:
पुण्यातील रिअल इस्टेट बाजारपेठेने नवीन पुरवठ्यामध्ये २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीमधील १३,३९० सदनिकांच्या तुलनेत २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक ९९ टक्क्यांच्या वाढीसह २६,६१० सदनिकांपर्यंत वाढीची नोंद केली. तसेच २०२२ च्या पहिल्या सहामाहीमधील २८,९७० सदनिकांच्या तुलनेत २०२३च्या पहिल्या सहामाहीमध्ये (जानेवारी २०२३ ते जून २०२३) ११४ टक्क्यांच्या सहामाही वाढीसह ६२,१०० सदनिकांपर्यंत वाढीची नोंद केली. चारहोली बुद्रुक, हडपसर व पुनावाले यांसारख्या स्थळांमध्ये सर्वाधिक नवीन सदनिकांचे लाँच दिसण्यात आले, ज्यामधून वाढत्या मागणीची पूर्तता करण्यात आली आहे.
पुण्यातील निवासी विक्री २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीमधील (एप्रिल २०२२ ते जून २०२२) १३,७२० सदनिकांवरून २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत (जानेवारी २०२३ ते जून २०२३) वार्षिक ३७ टक्क्यांच्या वाढीसह १८,८५० सदनिकांपर्यंत वाढली आणि २०२२ च्या पहिल्या सहामाहीमधील ३०,०३० सदनिकांवरून २०२३च्या पहिल्या सहामाहीमध्ये (जानेवारी ते जून २०२३) २६ टक्क्यांच्या सहामाही वाढीसह ३७,७६० सदनिकांपर्यंत पोहोचली. हडपसर, चारहोली बुद्रुक, ताथवडे, रावेत, हिंजवडी या औद्योगिक पट्ट्यात मालमत्तांसाठी मागणी प्रबळ राहिली.
किंमत श्रेणीच्या संदर्भात बहुतांश मागणी (३६ टक्के) ४५ ते ७५ लाख रूपये श्रेणीमधील सदनिकांसाठी दिसण्यात आली. २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत १ कोटी रूपये व त्यावरील किंमतीच्या श्रेणीमधील सदनिकांचा एकूण विक्रीत १४ टक्के हिस्सा होता, तुलनेत २०१९ च्या दुसऱ्या तिमाहीच्या महामारीपूर्वीच्या काळामध्ये ५ टक्के हिस्सा होता. २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत विक्री करण्यात आलेल्या ५३ टक्के सदनिकांमध्ये २ बीएचके कन्फिग्युरेशनचा समावेश होता, तर विक्री करण्यात आलेल्या २५ टक्के सदनिकांमध्ये १ बीएचके सदनिकांचा समावेश होता.
प्रॉपटायगर डॉटकॉम, हाऊसिंग डॉटकॉम व मकान डॉटकॉमच्या संशोधन प्रमुख श्रीमती. अंकिता सूद म्हणाल्या, “शहरांमध्ये उच्चस्तरीय मालमत्तांसाठी मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अधिकाधिक मोबाइल खरेदीदार विशेषत: महामारीनंतरच्या काळात जीवनशैली व सुरक्षित आसरा म्हणून या मालमत्तांना प्राधान्य देत आहेत. पुण्यातील घरांच्या मागणीमध्ये मध्यम ते उच्च विभागापासून बदल दिसण्यात आला आहे, जेथे १ ते ३ कोटी रूपये किमतीच्या घरांच्या मागणीमध्ये २०१९ च्या महामारीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत ११७ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ दिसण्यात आली.”
Real Estate Mumbai Pune Home Property Demand Flats
Construction