मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील घरे आणि भूखंडांचे गगनाला भिडणारे भाव हा नेहमीच आश्चर्याचा विषय असतो. त्यातही जर ठिकाण जुहू, पाली हिल किंवा दक्षिण मुंबईसारखा भाग असेल तर तिथले भाव प्रचंड असतात आणि बाजारात त्यांची चर्चा होत राहते. मुंबईत राहणं हे सध्या फारच महागडं झालं आहे. त्यात मुंबईत घर घेणं हे तर आज सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. मुंबईत घरं घेणं हे आज एक प्रकराचं स्वप्न होऊन बसलं आहे. विशेषत: दक्षिण मुंबईत. आज देशातील सर्वात महागडा परिसर हा दक्षिण मुंबईतील ताडदेव हा परिसर समजला जातो .मुंबई महानगर विभागात मोठं घर घेणं मध्यमवर्गीयांसाठी फार कठीण आहे. त्यामुळे खूप पैसे नसतील तर मुंबई महानगर विभागात (एमएमआर) घर घेणं हे एक फार मोठं आव्हान आहे.
मुंबईत मोकळ्या जमिनीची कमतरता आहे. परिणामी मुंबई शहर आणि उपनगरांमधली ठिकाणं उभ्या दिशेने विकसित होत आहेत. मुंबई उपनगरातील अशाच एका भूखंडाच्या विक्रीची म्हणजेच त्याला मिळालेल्या विक्रमी मूल्याची चर्चा मालमत्ता बाजारात दीर्घकाळ होत राहणार आहे. हा भूखंड आहे जुहूतील. ६९८८ चौरस मीटरचा हा भूखंड ३३२ कोटीं रुपयांना विकला गेला आहे. हा एक मोठा व्यवहार असल्याचे मानले जाते. मुंबई उपनगरातील या भूखंडाच्या विक्रमी किमतीची पुढील अनेक दिवस चर्चा सुरूच राहील. पश्चिम उपनगरातील प्राइम जुहू तारा रोड येथे असलेला १.७ एकरचा भूखंड तब्बल ३३२ कोटी रुपयांमध्ये विकला गेला आहे. हॉटेल सी प्रिन्सेस जवळील ६,९८८ चौरस मीटरचा भूखंड अग्रवाल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने विकत घेतला आहे. तर पवनकुमार शिवलिंग प्रभू असे या विक्रेत्याचे नाव आहे. वांद्रे, सांताक्रूझ, जुहू, अंधेरी येथील भूखंडांना मोठा भाव आहे. यासर्वांमध्ये जुहू आणि अंधेरी निवासी आणि अनिवासी, या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांसाठी ग्राहकांच्या पसंतीचा परिसर मानला जातो.
७ सप्टेंबर रोजी हा व्यवहार नोंदणीकृत झाला आणि जवळपास २० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले. दरम्यान, नवीन खरेदीदार जमिनीचा वापर कशासाठी करणार हे माहीत नाही. नवीन खरेदी केलेली मालमत्ता निवासी प्रकल्पासाठी असू शकते असा दावा मालमत्ता बाजारातील सूत्रांनी केला आहे. जुहू, एक रिअल इस्टेट हॉटस्पॉट आहे, जिथे अनेक निवासी लक्झरी मालमत्ता येत असल्याचे पाहिले जात असून विकासकांकडून या जागेल खूप मागणी मिळत आहे.
मुंबई उपनगरात काही प्रमाणात मोकळे भूखंड असून त्यांना मोठी मागणी आहे. वांद्रे, सांताक्रूझ, जुहू, अंधेरी येथील भूखंडांना चढा भाव आहे. जुहू, अंधेरी परिसर निवासी आणि अनिवासी या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांसाठी ग्राहकांच्या पसंतीचा परिसर मानला जातो. त्यातही आलिशान सदनिका, बंगले आणि कलाकार, वलयांकितांच्या वास्तव्याचे ठिकाण म्हणून जुहू परिसराला ओळखले जाते. याच भागातील एक भूखंड विक्रमी किंमतीला विकला गेल्याची माहिती उघड झाली आहे. जुहूतील मालमत्ता बाजारातील एक मोठा व्यवहार म्हणून या भूखंडविक्रीकडे पाहिले जात आहे.
सदर भूखंड हा अग्रवाल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केला आहे, त्याच कंपनीने गेल्या वर्षी जुहूत एक महागडा बंगला खरेदी केला होता. प्रसिद्ध लेखक सिद्धार्थ धनवंत संघवी यांचा जुहू येथील ९७९५ चौ. फुटांचा बंगला याच कंपनीने खरेदी केला होता. त्यासाठी कंपनीने ८४ कोटी ७५ लाख रुपये मोजले होते. आता वर्षभरात कंपनीने ही दुसरी मालमत्ता खरेदी केली आहे. दुसरीकडे शहरातील लक्झरी रियल्टी मार्केट नवीन उच्चांक गाठत आहे. गेल्या आठवड्यात नोंदणीकृत झालेल्या ताज्या करारासह विकासकाने वरळीतील एका आलिशान इमारतीतील दोन फ्लॅटमधून १५१ कोटी रुपयांची कमाई केली. हा करार अल्ट्रा-लक्झरी प्रकल्प ३६० (थ्री सिक्स्टी) वेस्टमध्ये झाला, ज्यामध्ये शाहिद कपूरसह अनेक आघाडीचे व्यावसायिक आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे घर आहे.
Real Estate 6988 SQMT Plot Sale 332 Crore
Mumbai Property