बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पहिल्या तिमाहीत घरांची विक्री मंदावली: वाढत्या किंमतीमुळे नवीन लॉन्च प्रकल्पही रखडले

by India Darpan
एप्रिल 16, 2025 | 6:18 pm
in संमिश्र वार्ता
0
REA India 3

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन अँड अॅडव्हाईझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉमच्या अलीकडच्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरातील आठ प्रमुख बाजारपेठांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत १९ टक्केने कमी झाली आणि त्याचे कारण आहे मालमत्तेच्या वाढत्या किंमती आणि मंदावलेल्या वृद्धीमुळे खरेदीदार सावधगिरी बाळगून आहेत.

हाऊसिंग डॉटकॉमचे स्वामित्व ज्यांच्याकडे आहे त्या आरईए इंडियाचाच एक भाग असलेल्या प्रॉपटायगर डॉटकॉमने सादर केलेल्या रिअल इनसाइट रेसिडेन्शियल: क्यू१ २०२५ (जानेवारी-मार्च २०२५) अहवालानुसार या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नवीन घरांचा पुरवठा देखील १०% कमी झाला आहे, कारण विकासकांनी गेल्या काही वर्षांमधील किंमतीत झालेल्या नाट्यमय वृद्धीनंतर स्वतःच्या अपेक्षाही वाढवल्या, ज्यामुळे जगातील सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या आपल्या देशात मोठ्या भागाच्या खरेदीदारांसाठी घर खरेदी करणे परवडण्याजोगे राहिले नाही.

हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे ग्रुप चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. ध्रुव अग्रवाला म्हणाले, “वाढत्या महागाईचा विपरीत परिणाम विक्रीवर आधीच दिसू लागला आहे. त्यात जागतिक ट्रेड-वॉरमुळे नवीन अनिश्चितता आली आहे. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की, खरेदीदार गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगत आहेत आणि विशेष करून रिअल इस्टेट सारख्या मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत ते अधिकच सावध झाले आहेत. जर भारतीय रिझर्व बँकेने फेब्रुवारीत २५-बेसिस पॉइंटने दर कमी केल्याचे जाहीर केले नसते, तर विक्रीतील ही घट अधिकच तीव्र झाली असती.”

बंगळूर आणि चेन्नई वगळता सर्व शहरांत विक्री कमी झाली
या अहवालानुसार, जानेवारी-मार्च या तिमाहीत १००,००० पेक्षा कमी घरे विकली गेली. या विश्लेषणात समाविष्ट करण्यात आलेल्या बहुतांशी शहरांत ही संख्या घटल्याचे दिसते. बंगळूर आणि चेन्नईमध्ये हा ट्रेंड दिसला नाही, तर हैदराबाद, मुंबई आणि पुण्यात ही विक्री तीव्रतेने कमी झालेली दिसली.

बंगळुरूमध्ये २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ११,७३१ घरांच्या विक्रीसह १३%ची वाढ पहायला मिळाली. चेन्नईमध्ये ही ४,७७४ घरांच्या विक्रीसह ८%ची वाढ झाली. या तुलनेत इतर प्रमुख शहरांत घरांच्या विक्रीत घसरण झालेली पहायाला मिळाली. यात अहमदाबाद १०,७३० (-१७%), दिल्ली एनसीआर ८४७७ (-१६%), हैदराबाद १०,४६७ (-२६%), कोलकाता ३,८०३ (-१%), मुंबई ३०,७०५ (-२६%), आणि पुणे १७,२२८ (-२५) येथे घरांची विक्री मंदावलेली दिसली.

मार्केट करेक्शनचे संकेत नवीन पुरवठ्यात जी घट आली आहे त्यातून देखील दिसत होते. आठ पैकी पाच शहरांतील नव्या घरांच्या लॉन्चच्या संख्येत वार्षिक घट दिसून आली. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादेत संख्येच्या दृष्टीने सर्वात तीव्र घसरण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये २०२४ च्या तुलनेत नवीन लॉन्च झालेल्या घरांच्या संख्येत क्रमशः १५,५४३ (-३८%), १०,१५६ (-३३%), २,३८४ (-२३%) ची घट झाली आहे. इतर प्रमुख शहरे जसे की चेन्नई ४,०७० (-१४%), मुंबई ३१,३२२ (-१५%) येथे ही नवीन लॉन्च प्रकल्पात घट झाली असल्याचे पहायला मिळाले. याउलट बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि कोलकाता येथे मात्र नवीन लॉन्च प्रकल्पात वाढ झाली आहे. ही वाढ क्रमशः १८,१८३ (८२%), ७,९५२ (१६%) आणि ३,५३४ (१३८%) इतकी आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दोन घरफोडीत चोरट्यांनी साडे तीन लाख रूपये किमतीच्या ऐवजावर मारला डल्ला

Next Post

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठित….

Next Post
Maha Gov logo 07 1 1024x512 1

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठित….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011