इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर ८ धावांनी मात ट्रॉफी जिंकल्यानंतर आज बंगळुरुमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत चेंगरचेंगरी होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले आहे.
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चॅम्पियन संघाची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे चाहते उपस्थित होते.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आज येथे सर्व RCB खेळाडूंसाठी एक विशेष सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उपस्थितीत होते. त्याअगोदर मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात ही घटना घडली.
या घटनेत पोलिसांनी गर्दीला आवरण्यासाठी सौम्य लाठीमार केला होता. त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली.