मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय ) प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीवर सक्तीच्या कर्ज वसुलीसाठी निर्बंध घातले आहेत. यापुढे या फायनान्स कंपनीला आऊटसोर्सिंगचा वापर करून कोणत्याही प्रकारे सक्तीने कर्ज वसुली करता येणार नाही, असे निर्देश आरबीआयने दिले आहेत. त्यामुळे खासगी फायनान्स कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आरबीआयने महिंद्रा फायनान्स वर अशाप्रकारे कारवाई करण्याचे कारण म्हणजे बिहारमधील हजारीबागमध्ये मिथिलेश मेहता हा शेतकरी अपंग असून त्याने महिंद्रा फायनान्सकडून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची १ लाख ३० हजार रुपयांची थकबाकी रक्कम मुदतीच्या तारखेला जमा करु शकला नव्हता. त्यामुळे मागील आठवड्यात महिंद्रा फायनान्स कंपनीचे अधिकारी न कळवताच ट्रॅक्टरच्या वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरी पोहोचले होते. कंपनीचे एजंट व अधिकाऱ्यांनी त्याचे घर गाठून ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागले.
त्याचवेळी शेतकरी मेहता यांची २७ वर्षीय गरोदर मुलगी मोनिका यांनी धावत येत एजंटांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोनिकाला चिरडून ट्रॅक्टरचालक व वसूली अधिकारी पुढे निघून गेला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या कंपनीच्या व्यवहाराची तपासणी करण्यासाठी एसआयटीच्या विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात आली होती.
महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी झारखंडमधील घटनेवर शोक व्यक्त केला होता. तर महिंद्रा यांनी महिंद्रा फायनान्सचे सीईओ आणि एमडी अनिश शाह यांनी म्हटले होते की, हजारीबागच्या घटनेमुळे आम्ही खूप दुःखी आणि अस्वस्थ आहोत. तसेच ही दुर्दैवी घटना असून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कंपनीकडून सर्व सहकार्य केले जाईल असे म्हटले होते, परंतु दरम्यान बिहारमध्ये ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये या गर्भवती मुलीच्या मृत्यू प्रकरणामुळे सदर फायनान्स कंपनीविरुद्ध मोठा असंतोष पसरला होता. या घटनेचे गांभिर्य ओळखून आरबीआयने ही कारवाई केली आहे.
आउटसोर्सिंग म्हणजे एखाद्या आर्थिक संस्थेच्या कर्ज वसुलीसाठी बाहेरच्या घटकाला कंत्राट देऊन सक्तीने वसूली करून घेण्यात येते. तसेच अशा प्रकारे ही सेवा विकत घेणे, याला आउटसोर्सिंग किंवा बाह्य कंत्राट असे म्हणतात. याची सुरुवात २१ व्या शतकात होण्यापूर्वी अमेरिकेत झाली होती. सध्या भारतातही अशा प्रकारे अनेक खासगी बँका तसेच आर्थिक संस्था आऊटसोर्चींगचा वापर करीत आपल्या कर्ज वसुलीसाठी एजंट नेमतात. हे एजंट कर्ज वसुलीसाठी बाऊन्सर प्रमाणे असलेल्या तरुणांकडून गुंडागर्दी करीत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तीवर दादागिरी करीत वसुली करतात.
काही प्रसंगी या प्रकरणांमध्ये हाणामारी देखील होते, असे दिसून येते. परंतु रिझर्व बँक ऑफ इंडियाने यासंदर्भात आधीच काही निर्बंध जाहीर केले आहेत. कोणत्याही खासगी असो की शासकीय बँक किंवा संस्थेला तसेच फायनान्स कंपनीला कर्ज वसुलीसाठी सक्ती किंवा दादागिरी करता येणार नाही विशेषतः आउटसोर्सिंगचा सक्तीने वापर करता येणार नाही, असे जाहीर केलेले आहे.
RBI Strong Action on Mahindra Finance Loan Recovery
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/