मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर कर्जदार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, आता तुमच्या कर्जाचा हफ्ता वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेची गेल्या तीन दिवसांपासून बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास यांनी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयने रेपो दरात 0.35% वाढ जाहीर केली आहे. आता आरबीआयचा रेपो रेट 5.4% वरून 6.25% झाला आहे. याआधी आरबीआयने ऑक्टोबर आणि ऑगस्टमध्येही रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. मे महिन्यात झालेल्या एमपीसीच्या बैठकीतही रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.90% करण्यात आला.
रेपो दर वाढीची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नरने असेही सांगितले की, पुढील चार महिन्यांत महागाई दर 4 टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता आहे. एमपीसीच्या सहापैकी पाच सदस्यांनी रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. रेपो रेटची घोषणा करताना, दास यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा दिसून येत आहे. ग्राहकांचा आत्मविश्वासही वाढला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये जीडीपी वाढ 6.8% असू शकते. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत सीपीआय 5% वर राहू शकेल.
रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या आगामी पतधोरण आढाव्यात रेपो दरात 35 bps वाढ करण्याचा पर्याय निवडला आहे. किरकोळ चलनवाढ कमी होण्याची चिन्हे आणि तज्ज्ञांच्या मते वाढीला चालना देण्याची गरज आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सोमवारपासून सुरू झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) तीन दिवसीय बैठकीनंतर 7 डिसेंबर (बुधवार) रोजी त्यांचे पुढील द्वि-मासिक धोरण सादर केले आहे.
रेपो दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम असा होईल की तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. आरबीआय जेव्हा जेव्हा व्याजदर वाढवते तेव्हा त्याचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरात वाढ होताना दिसतो. त्याच्या अनेक व्यावसायिक बँकांद्वारे व्याजदर देखील वाढविला जाऊ शकतो.
RBI Repo Rate EMI Increased Governor Declare