मुंबई – नियमांचे पालन करणाऱ्या बँकांना कुठलीही दया मया न दाखविण्याचा पवित्रा रिझर्व्ह बँकेने कायम ठेवला आहे. आताही नियमबाह्य काम केल्याने रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाला तब्बल १ कोटी रुपयांचा दंड केला आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात पुन्हा रिझर्व्ह बँकेच्या कडक कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यात रिझर्व्ह बँकेने विविध बँकांवर कारवाई केली आहे. स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेकडूनच नियमांचे पालन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, बँकेला १ कोटी रुपयांचा दंड आता झाला आहे.
https://twitter.com/ANI/status/1450096499371622406