नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने जागतिक पातळीवर मोठा विक्रम केला आहे. बँकेच्या ट्विटरवर अकाऊंटला फॉलो करणाऱ्यांची म्हणजेच फॉलोअर्सची संख्या तब्बल १० लाख झाली आहे. हा टप्पा गाठणारी आरबीआय ही जगातील पहिली केंद्रीय बँक बनली आहे. अत्यंत कमी आर्थिक क्षमता असलेल्या आरबीआयने अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आणि युरोपियन मध्यवर्ती बँकेचा फॉलोअर्सच्या संख्येत चक्क पराभव केला आहे. आता आरबीआय ही ट्विटरवरील सर्वात लोकप्रिय मध्यवर्ती बँक बनली आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्वचे ट्विटरवर ६.६७ लाख फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या फॉलोअर्सची संख्या ५.९१ लाख आहे. ८५ वर्षाच्या रिझर्व्ह बँकेचे ट्विटर अकाउंट जानेवारी २०१२ मध्ये सुरू करण्यात आले. म्हणजेच, अवघ्या ८ वर्षात आरबीआयने जगातील सर्वाधिक फॉलोअर्स मिळविले आहेत. त्यामुळे भारतासाठी ही बाब अभिमानाची ठरली आहे.