अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सामना दैनिकात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल अपमानस्पद भाषा वापरल्याचे सांगत आज सटाणा तालुक्यातील उत्तराने गावात संजय राऊत यांचा पुतळा दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. रयत संघटनेचे दीपक पगार यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला दवाखान्यात लवकर पाठवा अशी मागणी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.