गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिव व्याख्याते धिरेंद्र ठाकूर यांचे व्याख्यानाने प्रभावित होऊन दुंदराई गावातील शेकडो शिवप्रेमींचे रायगडावर प्रस्थान

by India Darpan
मार्च 24, 2025 | 6:59 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250322 WA0042 scaled e1742779725321

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सह्याद्री रत्न धिरेंद्र ठाकूर अभ्यासपूर्ण शिव चिंतनातून नुकत्याच झालेल्या १९ फेब्रुवारीच्या २०२५ च्या शिवजयंती निमित्ताने एकाच दिवशी पाच ठिकाणी व्याख्यानमालेतून शिव विचारांचा जागर घालण्यात आला.
गतवर्षी १९फेब्रुवारी २०२४ ला एकाच दिवशी चार व्याख्यान देण्याचं उल्लेखनीय काम त्यांच्या हातून झालं होतं. अगदी यावर्षीही त्यांनी एकाच दिवशी गाव आणि शहरात पाच ठिकाणी व्याख्यान देऊन शिवचरित्राचा जागर प्रभावीपणे मांडला.

१९ फेब्रुवारीला २०२५ च्या शिवजयंती निमित्त प्रथम रायगड जिल्हा परिषद शाळा करवले, नंतर पेण -दादर तसेच पनवेल मधील सर्वात मोठी रहिवासी कॉलनी बालाजी सिंफोनी येथे, त्याच्यानंतर दुंदराई गावात व्याख्यान झाल्यानंतर करंजाडे पनवेल येथे निवेदनात्मक व्याख्यान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा, नेतृत्वाचा गौरवशाली इतिहास दाखले देऊन आपल्या अनोख्या शैलीतून त्यांनी प्रभावीपणे मांडला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेले एक नव्हे तर चार स्वराज्य ,तसेच इतिहासातील दुसरी पावनखिंड, छत्रपतींचा साम्राज्य नव्हे स्वराज्य ,कोकण किनारपट्ट्यातील स्वराज्यासाठी खर्चिक पडलेले मावळे अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. यामध्ये दुंदराई गावात झालेल्या व्याख्यानात उपस्थित शिवप्रेमींना ‘एकदा तरी रायगड किल्ला पहावा’ असे अवाहन केल्यानंतर व्याख्यानातून प्रेरणा घेऊन गावातील लहान मुलं, विद्यार्थी, तरुण ,प्रौढ, शिवप्रेमी धरतीवरील स्वर्ग म्हणजे रायगड किल्ला भेट देण्यासाठी सज्ज झाले आणि त्यांनी शिवछत्रपतींच्या स्वराज्याची प्रत्यक्ष माहिती घेतली.विशेष म्हणजे दुंदराई गावातील ,रायगड जिल्हा परिषदेचे आदर्श ,प्रामाणिक आणि गुणवंत शिक्षक संतोष पाटील यांनी रायगडाला भेट देण्यासाठी पुढाकार घेऊन त्याचं नियोजन व संयोजन केले. सन्माननीय ग्रामस्थांनी ,दानशूर व्यक्ती, समाजसेवकांनी या स्तुत्य उपक्रमासाठी सर्वतोपरी मदत केली व त्यात सहभागी झाले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रीय लोक अदालतीत ११,०८१ प्रकरणे निकाली; ३१.५५ कोटींची वसुली

Next Post

राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध होणार…

Next Post
whatsapp

राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध होणार…

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011