– अॅड प्रणिता देशपांडे, द हेग (नेदरलँड)
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा उत्सव सुरू ठेवत, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची 161 वी जयंती भारतीय दूतावास, नेदरलँड येथे आयोजित कार्यक्रमात साजरी करण्यात आली आणि गांधी सेंटरने ‘सेलिब्रेटिंग टागोर’ या संकल्पनेच्या आधारावर, काव्यात्मक आणि संगीतमय पध्दतीने सोमवार दिनांक 9 मे 2022 रोजी साजरी करण्यात आली.
रवींद्र जयंती हा एक सांस्कृतिक उत्सव आहे जो दरवर्षी टागोरांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.बंगाली लोकांमध्ये हा दिवस पोंचिशे बैशाख म्हणून प्रसिद्ध आहे. प्रख्यात डच कवी फ्रेडरिक व्हॅन ईडेन यांनी टागोरांच्या कवितांचा डच भाषेत अनुवाद केला. डचमध्ये ????????????-???????????????????????? नावाची गीतांजली अनेक वेळा पुनर्मुद्रित झाली. तेव्हापासून टागोरांच्या अनेक कामांचे डच भाषेत भाषांतर झाले आहे.
टागोर यांनी 1920 मध्ये नेदरलँड्सलाही भेट दिली आणि मोठ्या शहरांमध्ये व्याख्यानांसह नवीन तात्विक विचारांचा परिचय करून दिला.
गांधी केंद्राचे संचालक शिव मोहन सिंग यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेल्या मानवतावादाच्या संदेशावर छोटेसे भाषण केले.
नेदरलँड्समधील भारताच्या राजदूत श्रीमती रीनत संधू यांनी कलाकारांचे अभिनंदन केले आणि त्यांना कविता आणि टागोरांचे आदर्श आणि जीवनपद्धतीचा अभिमान आणि आनंद सतत जागृत करण्यासाठी प्रोत्साहित केले. आर.चंदर यांनी सध्याच्या संदर्भात टागोरांच्या शिकवणींच्या प्रासंगिकतेवर एक संक्षिप्त भाषण दिले.
नेदरलँडमधील भारतीय डायस्पोरानेही टागोर यांच्या कविता वाचन, नृत्य आणि श्रद्धांजली म्हणून त्यांची अमर गाणी सुध्दा गायली .
पियाली आणि देबश्री यांचे कविता पठण, प्रज्ञा भट्टाचार्य, जयिता, संदीप भट्टाचार्य यांचे रवींद्र संगीत आणि शेवटी प्रियंका आणि नोआ यांनी रवींद्र नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौम्या शुक्ला यांनी केले