इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेस पक्ष सोडणार असून ते शिवसेना शिंदे गटाता प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. आज ते उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांची सायंकाळी भेट घेणार असून त्यानंतर ते निर्णय जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे.
गेली ३० वर्ष सर्वसामान्य पुणेकरांसाठी लढणारा माणूस म्हणून माझी ओळख आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी लढत असताना मला बळ देणाऱ्या पक्षाचा विचार मी यापुढील काळात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्यकडे मी काहीही मागितलं नाही, त्यांच्यासोबत काम करायचं आहे. काँग्रेस सोडत असतांना वाईट वाटतं आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन तीन वेळा फोन केला. उद्य सामंत देखील भेटले. त्यांनी आमच्याकडे या असं सांगितलं असंही रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमधून बाहेर पडण्याची चर्चा होती. ते शिवसेना शिंदे गटात जातील असेही बोलले जात होते. पण, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. पण, आता त्यांनी पुन्हा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे संकेत दिले.