नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने १ फेब्रुवारी ७ फेब्रुवारी दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दोन मुखी हनुमान मंदिराजवळ आज सायंकाळी ५.६० या वेळेत वेदगंगा सोहळ्याच्या माध्यमातून १५१ ब्रह्मवृंदाकडून वेद पारायण करण्यात आले. या सोहळ्यास नागपूर येथील संघ प्रचारक रवी भुसारी यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्यास नाशिककरांचा उदंड असा प्रतिसाद लाभला.