इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशातील प्रसिध्द उद्योगपती व टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. रात्री उशीरा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती प्रसारीत झाल्यानंतर रतन टाटा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, माझी प्रकृत्ती उत्तम, अफवांवर विश्वास ठेवू नका.
त्यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले की, माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अलीकडील अफवांची मला जाणीव आहे. हे दावे निराधार आहेत. याची सर्वांना खात्री देऊ इच्छितो. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे. चिंतेचे कारण नाही. मी विनंती करतो की सार्वजनिक आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावे.
सूत्रांनी दिली होती ही माहिती
हृदरोगतज्ञ डॅा. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली उपचार केले जात आहे. डॅा. शाहरुख एक विख्यात डॅाक्टर आहेत. रतन टाटा यांना रात्री उशिरा १२.३० ते १ दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा रक्तदाब ऱात्री कमी झाला होता. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.