मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – शेअर मार्केट हा खरे म्हणजे एक प्रकारे जुगार मानला जातो. परंतु त्यातही काही वेळा गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून करोडपती देखील होऊ शकतात. टाटा समूहाची कंपनी Tata Elxsi ने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
टाटा समूहाच्या या समभागाने गेल्या 13 वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना 14,102 टक्के पेक्षा जास्त स्टॉक परतावा दिला आहे. ज्यांनी दीर्घकालीन पैसा लावला त्यांना करोडोंचा फायदा झाला. दि. 8 मे 2009 रोजी, टाटा अलेक्सई BSE वर शेअर 59.20 रुपये प्रति शेअर होता. तर दि. 20 मे 2022 रोजी या समभागांनी BSE वर 8,408.55 रुपयांची पातळी गाठली. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी प्रचंड परतावा दिला आहे.
समभागाने पाच वर्षांत 1,137.19 टक्के परतावा दिला आहे. या वेळी हे शेअर्स 679.65 रुपयांवरून 8,408.55 रुपयांपर्यंत वाढले. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात हे समभाग प्रति स्तर 3568 रुपयांवरून 8,408.55 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत त्याने 135.62% परतावा दिला आहे.
Tata Elxsi च्या शेअर किंमत चार्ट पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 13 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 59.20 रुपये प्रति शेअर दराने एक लाख रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज ही रक्कम 1.42 पर्यंत वाढली असती. दुसरीकडे, पाच वर्षांपूर्वी जर एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 12.37 लाख रुपयांचा फायदा झाला असता. तसेच गेल्या एका वर्षात या स्टॉकने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी 2.35 लाख रुपये कमावले असते.