इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशातील प्रसिध्द उद्योगपती व टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. रात्री उशीरा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर हृदरोगतज्ञ डॅा. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली उपचार केले जात आहे. डॅा. शाहरुख एक विख्यात डॅाक्टर आहेत. रतन टाटा यांना रात्री उशिरा १२.३० ते १ दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा रक्तदाब ऱात्री कमी झाला होता. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.