नाशिक – कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांचे आरोग्य हित जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व युवक पदाधिकारी हे “घरबसल्या गणेश मूर्ती दान करा व कोरोना टाळा” हा उपक्रम राबवित आहे. कोरोना विषाणूमुळे गणेश भक्तांचा हिरमोड झाला व यंदा सर्वांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे तिसरी लाट येऊ नये याकरिता शासनाची नियमावली पाळली जात आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील विसर्जन स्थळी गर्दी होऊन कोरोना बाधितांची संख्या वाढू नये. याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी रविवार, (दि.१९) “घरबसल्या गणेश मूर्ती दान करा कोरोना टाळा” असा उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिककरांच्या घरी जाऊन गणेश मूर्तीचे संकलन करणार आहे. घरबसल्या गणेश मूर्ती दान करण्यासाठी विधानसभा व विभागनिहाय पदाधिकारी नेमण्यात आले आहे. संबधित विधानसभा व विभाग पदाधिकारी संकलित केलेल्या गणेश मूर्ती नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करून विसर्जन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
घरबसल्या गणेश मूर्ती दान करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले आहे.
गणेशवाडी परिसर संदीप गांगुर्डे- 9822231333, हिरावाडी परिसर संदीप खैरे – 9552900303, बीडी कामगार नगर संतोष जगताप – 9881211799, जेलरोड परिसर राहुल तुपे – ९६२३१८५०५०, नाशिकरोड परिसर सोनू वायकर – 9921825299, जुने नाशिक परिसर सागर बेदरकर – 9503650072, वडाळा गाव परिसर जय कोतवाल – 8888620999, नाशिक पुणे रोड परिसर विशाल माळेकर – 8983399997, कॉलेज रोड व गंगापूर रोड परिसर गणेश पवार – 7798666034, सातपूर गाव बाळा निगळ – 9922578777, सातपूर कॉलनी निलेश भंदुरे – 8888787772, सातपूर अंबड लिंक रोड परिसर रामदास मेदगे – 9421212766, श्रमिक नगर परिसर कल्पेश कांडेकर – 8149458446, उत्तमनगर विशाल डोखे – 9527235434, अंबिका नगर कामटवाडे राहुल कमानकर – 9834109135, पाथर्डी फाटा परिसर प्रशांत नवले – 9373317756, सावता नगर त्रिमूर्ती चौक पवन नगर मुकेश शेवाळे – 9607998888, राणे नगर परिसर विक्रांत डहाळे – 8007070501, डीजीपी २ अक्षय पाटील – 9021192077