नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी २५ उमेदवारांची यादी आज जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ७ उमेदवारांची यादी समोर आली आहे. याअगोदर शरद पवार गटाने ७६ जागा जाहीर झाल्या होत्या. आता त्यात सातने भर पडल्यामुळे ८३ उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहे.
जाहीर झालेल्या सात उमेदवारांमध्ये माण – प्रभाकर घार्गे, काटोल – सलील अनिल देशमुख, खानापूर – वैभव सदाशिव पाटील, वाई – अरुणादेवी पिसाळ, दौड – रमेश थोरात, पुसद – शरद मेंद, सिंदखेडा – संदीप बेडसे यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीने २८८ पैकी २६६ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात काँग्रेस ९९, शिवसेना ठाकरे गट ८४, राष्ट्रवादी शरद पवार गट ८३ जागा जाहीर झाल्या आहे. महाविकास आघाडीत १८ जागा या मित्रपक्षासाठी सोडल्या होत्या. त्याबाबत अद्याप निर्णय समोर आलेला नाही. या आघाडीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांत काही जागांवर मतभेद अजूनही कायम आहे. या आघाडीचा ९०-९०-९० असा फॅार्म्युला ठरला असल्याचे बोलले जात होते. पण, काँग्रेसने ९९ जागा जाहीर केल्या. त्यामुळे जागांवाटपाचे सूत्रही अद्याप पर्यंत समोर आलेले नाही.