इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशात मंडल आयोग लागू करण्याविरोधात भूमिका घेत भाजपाने कमंडल यात्रा काढली, परंतु देशात पहिल्यांदा मंडल आयोग लागू करण्याचं काम मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी केलं. पण सध्या ओबीसींना घाबरवण्याचं काम सध्या सुरु असून भाजपाचा खरा चेहरा लोकांपुढं आणण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्यावतीने राज्यव्यापी ‘मंडल यात्रा’ काढण्यात आली आहे. नागपूरमध्ये पवार साहेबांच्या हस्ते या ‘मंडल यात्रे’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे सांगण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे साहेब, ज्येष्ठ नेते अनिल देशमुख साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब, हर्षवर्धन देशमुख, खा. अमर काळे जी, ज्येष्ठ नेते राजेंद्र शिंगणे साहेब, रमेश जी बंग, सलील देशमुख, गुलाबराव गावंडे, मा. आ. प्रकाश गजभिये, शरद दादा तसरे, मा. आ. चरणभाऊ वाघमारे, सुनील गव्हाणे यांच्यासह पक्षाच्यावतीने ‘मंडल यात्रे’ची जबाबदारी असलेले मा. राज राजापूरकर तसंच स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते.
पुढील ४० दिवस राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यात १४ हजार ८७७ कि.मी. प्रवास करणार आहे. या प्रत्येक ठिकाणी ‘मंडल यात्रे’चं स्वागत करण्याची आणि या यात्रेच्या माध्यमातून आपल्या पक्षाची भूमिका, भाजपला ओबीसींबाबत असलेला राजकीय पुळका कसा पोकळ आहे आणि त्याचा कसा राजकीय फायदा उठवला जातो हे लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आपल्या प्रत्येकाची असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.