इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघठन बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी पक्षांतर्गत प्रमुख सात नेत्यांची एक ‘कोअर ग्रुप’ स्थापन करण्यात आली आहे. या ग्रपुमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ, धनजंय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांना मानाचे पान देण्यात आले.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांसह, पक्षसंघठनेची बांधणी, त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भातील महत्वाच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्वाचा उद्देश असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
कोअर ग्रुप सदस्यः
१. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष
२. खा. प्रफुलभाई पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष
३. खा. सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष
४. आमदार छगन भुजबळ जेष्ठ नेते
५. आमदार दिलीप वळसे पाटील जेष्ठ नेते
६. हसनजी मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य
७. धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य
