नाशिक- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निफाड पूर्व तालुकाध्यक्षपदी जयदत्त होळकर तर कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब भवर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या हस्ते होळकर व भवर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. येवला विधानसभा मतदार संघात असलेले व मूळ निफाड तालुक्यात असलेले लासलगाव, विंचूर व देवगाव या जिल्हा परिषद गटांचे कार्यक्षेत्र नवनिर्वाचित निफाड पुर्व तालुकाध्यक्ष होळकर व कार्याध्यक्ष भवर त्यांच्यासाठी असणार आहे.
सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण निफाड पुर्व तालुक्यात पक्ष वाढीसाठी सर्वोत्तरीपरी प्रयत्न करू असे श्री. होळकर व भवर यांनी आपल्या निवडीनंतर बोलतांना सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, प्रेरणा बलकवडे, पुरुषोत्तम कडलग, यशवंत शिरसाट, विजय पवार, समाधान जेजुरकर, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, पांडुरंग राऊत, दत्तू डोखळे, दत्ता रायते, शिवाजी तासकर, शिवाजी सुपनर, अनिल सोनवणे, अशोक नागळे, मंगेश गवळी, माधव जगताप, प्रदीप तिपायले, विनोद जोशी, अनिल बोचरे आदी उपस्थित होते. वरील नियुक्तीमुळे निफाड पुर्व तालुक्यात आनंदाचे वातावरण झाले असून सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.