मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी काळात राज्यभरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षातील अंतर्गत विषय आणि इतर चालू घडामोडींबाबत आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक येथे आज बैठक पार पडल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते.महाराष्ट्रातील विविध भागातील प्रश्न, कार्यकर्त्यांची निवेदने यावरही चर्चा झाली. शिवाय दिनांक ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरावरही चर्चा करण्यात आली. या शिबिराला राज्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.