मुंबई – जगभरात आणि देशभरात ट्वीटरच्या माध्यमातून केंद्रसरकार, मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत आहेत ते कसं थांबवावं यासाठी केंद्रसरकारच्या ट्वीटरवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
कुठल्याही देशात त्यांच्या कायद्यांतर्गत कुठलीही यंत्रणा असेल किंवा आस्थापना असेल त्यांच्यावर नियंत्रण करणं किंवा कारवाई करणं हा अधिकार असतो. परंतु केंद्रसरकार ट्वीटरसोबत का भांडतंय हा प्रश्न आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
लोकांना स्पष्ट पणे मत मांडायला ट्वीटरसारखा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे लोकांच्या बोलण्याच्या अधिकारावर गदा आणणं हे योग्य राहणार नाही असेही मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
—