नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिनही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा म्हणजेच शेतकरी बांधवांच्या एकजुटीचा विजय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी केले आहे. कृषी कायदे रद्द केल्याबाबत राष्ट्रवादी भवन येथे “अखेर शेतकऱ्यांपुढे झुकले मोदी सरकार” असे बॅनर झळकवत शेतकरी एकजुटीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. त्याप्रसंगी अॅड.पगार बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारने तीन कृषी कायदे कुठलीही चर्चा न होता संसदेत मंजूर करण्यात आले होते. हे कायदे रद्द करावे या मागणीसाठी देशाच्या इतिहासात पहिल्यादांच एक वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी बांधवांचे आंदोलन चालू होते. आज हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी भवन नाशिक येथे जल्लोष करण्यात आला.
यावेळी फटाके फोडून व पेढे भरवून कृषी कायदे रद्द केल्याबाबत स्वागत करण्यात आले. तसेच या आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील यावेळी वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निरीक्षक अजित घुले, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष अंबादास खैरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार कदम, सचिन पिंगळे, विक्रम कोठुळे, प्रफुल्ल पवार, गणेश गायधनी, सुनिल आहेर, राजू पवार, संदीप भेरे, विनायक कांडेकर, महेश शेळके, अक्षय कहांडळ, विशाल गायकर, अनिल पेखळे, स्वप्निल चुंभळे, किरण भुसारे, गोरख ढोकणे, आकाश पिंगळे, दिनेश धात्रक, निवृत्ती त्रिबेकर, रामेश्वर साबळे, कुंदन ढिकले, विक्रम जगताप, दर्शन घुले, जगदीश दावल, सचिन पवार, भावेश मंडलिक, अनिल धारराव आदी उपस्थित होते.