नाशिक – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील शौर्य, गुणवत्तापूर्ण सेवा तसेच उल्लेखनीय सेवेबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदकांची घोषणा झाली आहे. नाशिक शहर पोलिस दलातील उपनिरीक्षक संजय अण्णाजी कुलकर्णी यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाचा सन्मान प्राप्त झाला आहे. सध्या ते गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील सात जणांना शौर्य पदक, चार जणांना उल्लेखनीय सेवा तर ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल हा बहुमान प्राप्त झाला आहे. राष्ट्रपती पोलिस पदकासाठी देशातील ९३९ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संजय अण्णाजी कुलकर्णी हे सध्या उपायुक्त संजय बारकुंड यांचे वाचक म्हणून कार्यरत आहेत.
१७ अॉगस्ट १९८८ मध्ये ते पोलिस दलात दाखल झाले. त्यांनी आत्तापर्यंत पोलीस मुख्यालय, भद्रकाली, सातपूर, पंचवटी पोलीस ठाणे, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक परिक्षेत्र येथे कर्तव्य बजावले आहे. पोलीस उपनिरीक्षक श्संजय कुलकर्णी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन यापूर्वी पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह एक मे २००९ रोजी प्राप्त झाले होते. त्यांनी यापूर्वी बजावलेल्या उत्कृष्ट कर्तव्याची दखल घेत तत्कालीन पोलीस आयुक्तांनी, वेळोवेळी २८९ बक्षिसे व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. कुलकर्णी यांना हा बहुमान प्राप्त झाल्याने त्यांचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, श्रीमती चौगुले तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्रातील गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
शौर्य पदक –
जमादार गोपाल मणीराम उसेंडी, महेंद्र गणू कुलेटी, संजय गणपती बकमवार, उपनिरीक्षक भारत चिंतामण नागरे, दिवाकर केसरी नरोटे, निलेश्वर देवजी पाडा, संतोष विजय पोटावी.
उल्लेखनीय सेवा –
अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय महादेवराव कारगावकर, प्रल्हाद निवृत्ती खाडे (कमांडंट, राज्य राखीव दल, धुळे), पोलिस निरीक्षक चंद्रकांत रामभाऊ गुंडागे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा (पोलिस उपनिरीक्षक, नांदेड).
गुणवत्तापूर्ण सेवा –
राजेश प्रधान (विशेष महानिरीक्षक, बंदर सुरक्षा विभाग), चंद्रकांत महादेव जाधव (सह पोलिस आयुक्त, मिरा-भायंदर), सिताराम लक्ष्मण जाधव (उपअधीक्षक, वायरलेस, पुणे), भारत केशवराव हुंबे (उपअधीक्षक, एसीबी, परभणी), गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे (निरीक्षक, लातूर), अजयकुमार सूर्यकांत लांडगे (निरीक्षक, नवी मुंबई), जितेंद्र यशवंत मिसाळ (निरीक्षक, बृहन्मुंबई), विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा (उपअधीक्षक, सीआयडी, नागपूर), जगदीश जगन्नाथ कुलकर्णी (निरीक्षक, नवी मुंबई), सुरेंद्र गजेंद्र मलाले (निरीक्षक, औरंगाबाद), प्रमोद हरीराम लोखंडे (सहायक कमांडंट, राज्य राखीव दल, नागपूर), मिलिंद गणेश नागावकर (सहायक निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता, मुंबई), शशिकांत दादू जगदाळे (निरीक्षक, बृहन्मुंबई), रघुनाथ रामचंद्र निंबाळकर (सहायक पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई), राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतुल (उपनिरीक्षक, नागपूर), प्रकाश भिला चौधरी (उपनिरीक्षक, पुणे शहर), नंदकिशोर शांताराम सरफरे (उपनिरीक्षक, बृहन्मुंबई), राजेश रावणराव जाधव (उपनिरीक्षक, परभणी), शिवाजी विठ्ठल देसाई (उपनिरीक्षक, बृहन्मुंबई), राजाराम धर्मा भोई (उपनिरीक्षक, जळगाव), देवेंद्र परशराम बागी (उपनिरीक्षक, बृहन्मुंबई), संभाजी सुदाम बनसोडे (सहायक उपनिरीक्षक, सातारा), बबन नारायण शिंदे (सहायक उपनिरीक्षक, कोल्हापूर), पांडुरंग लक्ष्मण वांजळे (सहायक उपनिरीक्षक, पुणे शहर), विजय उत्तम भोंग (सहायक उपनिरीक्षक, पुणे शहर), पांडुरंग पंढरीनाथ निघोट (सहायक उपनिरीक्षक, नवी मुंबई), राजेंद्र कृष्णा चव्हाण (सहायक उपनिरीक्षक, बृहन्मुंबई), अनिल पांडुरंग भुरे (सहायक उपनिरीक्षक, भंडारा), संजय एकनाथ तिजोरे (सहायक उपनिरीक्षक, पीसीआर, अहमदनगर), रवीकांत पांडुरंग बडकी (सहायक उपनिरीक्षक, यवतमाळ), अल्ताफ मोहियोद्दीन शेख (सहायक उपनिरीक्षक, पीसीआर, अहमदनगर), सत्यनारायण कृष्णा नाईक (सहायक उपनिरीक्षक, बृहन्मुंबई), बस्तार लक्ष्मण मडावी (सहायक उपनिरीक्षक, गडचिरोली), काशिनाथ मारुती उभे (सहायक उपनिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे), अमरसिंग वसंतराव भोसले (सहायक उपनिरीक्षक, एसीबी, कोल्हापूर), आनंदराव गोपीनाथ कुंभार (सहायक उपनिरीक्षक, सांगली), मधुकर हरीश्चंद्र पवार (सहायक उपनिरीक्षक, बृहन्मुंबई), सुरेश मुरलीधर वानखेडे (सहायक उपनिरीक्षक, नागपूर), लहू मनोहर राऊत (सहायक उपनिरीक्षक, बृहन्मुंबई),