नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने त्यांची बदली करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्याच चर्चेत आल्या होत्या.
काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्या तक्रारींवर ही कारवाई करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला, DGP महाराष्ट्र यांची तत्काळ प्रभावाने बदली करण्याचे आदेश दिले आहेत आणि मुख्य सचिवांना निर्देश देऊन त्यांचा पदभार पुढील सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवला आहे. डीजीपी महाराष्ट्र म्हणून नियुक्तीसाठी ५.११.२०२४ (दुपारी १ वाजता) पर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत,
निवडणुक आयोगाचे सीईसी राजीव कुमार यांनी यापूर्वी आढावा बैठका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेच्या वेळी अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्ष आणि निष्पक्ष नसून त्यांचे कर्तव्य पार पाडताना पक्षपाती नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
मुदतवाढही देण्यात आली होती
केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार २९ डिसेंबर २०२३ रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घेत ४ जानेवारी २०२४ रोजी राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली. त्यानंतर त्यांना मुदतवाढही देण्यात आली.
पहिल्या महिला पोलीस महासंचालक
राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्यांपैकी एक, आहेत.