इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुन्हेगारी वृत्ती फोफावत असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. अलीकडेच दिल्लीमध्ये एका तरुणीला कारने १२ किलोमीटर फरफटत नेले. त्यात त्या तरुणीचा मृत्यू झाला होता. बंगळुरूमध्ये एका तरुणाने हा प्रकार ज्येष्ठ नागरिकासोबत केला, पण सुदैवाने ज्येष्ठाचे प्राण गेले नाहीत.
बंगळुरूमधील एक व्हिडियो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये एक तरुण ज्येष्ठ नागरिकाला स्कुटरने फरफटत नेत असल्याचे दिसत आहे. जवळपास एक किलोमीटर वृद्धाला फरफटत नेले. त्यात वृद्धाचा मृत्यू झाला नसला तरीही त्याला गंभीर जखम झाली आहे. एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एक दुचाकीचालक चुकीच्या बाजुने स्कुटी घेऊन येत होता. त्याने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. कारचालकाला संताप आला. त्याने कार थांबवली आणि स्कुटीच्या मागे गेला. त्याने स्कुटीला मागून पकडले आणि गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. पण त्याने गाडी थांबवली नाही आणि एक किलोमीटर वृद्धाला फरफटत नेले. या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाला असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. बंगळुरूमधील मागदी रोडवर ही घटना घडली. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहे.
लोक ओरडत होते
स्कुटीमागे वृद्ध फटफटत जात असल्याचे लोकांना दिसत होते. लोक ओरडून त्या तरुणाला सांगत होते. पण तो मागे वळून बघत होता आणि गाडी पुढे नेत होता. वृद्धाने गाडीवरील हात काढला की नाही, हे तो वारंवार बघत होता. पण तरीही त्याने गाडी थांबवली नाही.
https://twitter.com/ANI/status/1615302033774612480?s=20&t=rTShpmIBtikUSw_IJ_A7AQ
Rash Driving Senior Citizen Dragged by Scooter Video Viral