नाशिक – सातपूर औदयोगिक वसाहतीतील व्हीआयपी इंडस्ट्री लिमिटेड येथे रसेल कुकरी सर्प आढळून आला. प्रसंगावधान राखून सर्प न मारता कंपनीतील कर्मचारी चेतन सिंग यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र धीरज शेकोकारे यांना संपर्क करून बोलवले. सर्पमित्रांमार्फत सर्प सुरक्षितरित्या पकडण्यात आला. या सापाची वनविभागात नोंद करून त्यास योग्य अधिवासात सोडण्यात आले. रसेल कुकरी सर्प दुर्मिळ असून नाशिक विभागात या सर्पाच्या फार कमी नोंदी असल्याचे सर्पमित्र सचिन ठाकूर आणि दीपक महाजन यांनी सांगितले आहे.
—
पावसाळ्यात निवारा आणि भक्क्ष याच्या शोधात अनेक सर्प मानव वस्तीत येतात . असे सर्प दिसल्यास त्यांना मरण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये .त्या बद्दल वनविभाग किंवा जवळील सर्पमित्र यांना संपर्क साधावा .असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थे मार्फत नागरिकांना करण्यात आले आहे – सर्पमित्र धिरज शेकोकारे (सचिव, वन्यजीव संरक्षण संस्था, नाशिक)
—
नाशिक जिल्हा हा जैवविविधतेच्या दृष्टीने परिपूर्ण असून अनेक दुर्मिळ प्रजातीचे साप,पक्षी तसेच कीटक हे आढळून येतात तसेच या परिपूर्ण जैवविविधतेचे संगोपन होणे आवश्यक आहे.काही वर्षांपूर्वी या प्रकारचे सर्प हे मुबलक प्रमाणात होते पण वाढत्या जंगलतोड आणि काँक्रिट चे जंगल यामुळे ते दुर्मिळ झाले.
– जयेश पाटील (अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था, नाशिक)