नवी दिल्ली – भारतीय खगोल वैज्ञानिकांनी अंतराळातील महाविशाल तीन कृष्णविवरांचे विलीन झाल्याच्या दुर्मीळ घटनेचा शोध लावला आहे. यामुळे अॅक्टिव्ह गॅलेक्टिक न्युक्लिअसची (एजीएन) निर्मिती होते. ही दुर्मीळ घटना नव्याने शोध घेतलेल्या आकाशगंगाच्या केंद्रात घडली आहे, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दिली. अंतराळात घडणारी ही अतिशय दुर्मीळ घटना आहे. विलीन होणारे लहान समूह अनेक महाकाय कृष्णविवरांचा शोध घेण्याची प्रयोगशाळाच असते. या घटनांचा शोध घेण्याची शक्यता वाढते. कोणत्याच प्रकारला प्रकाश उत्सर्जित होत नसल्याने महाकाय कृष्णविवरांचा शोध घेणे खूपच कठीण असते.
प्रकाश का दिसतो
कोणत्याही महाकाय कृष्णविवरावर आसपासची धूळ आणि वायू असतो. तेव्हा तिथे काही प्रमाणात द्रव्यमान गिळून टाकला जातो. परंतु त्यामधील द्रव्यमान उर्जेत परावर्तित होऊन वीज चुंबकिय विकीरणाच्या रूपाने उत्सर्जित होते. त्यामुळे कृष्णविवर खूपच चमकतो. त्यालाच अॅक्टिव्ह गॅलेक्टिक न्युक्लिअस असे म्हटले जाते.
असे सापडले कृष्णविवर
एनजीसी ७७३३ आणि एनजीसी ७७३४ च्या कृष्णविवराच्या परस्पर अंतर्कियेचा अभ्यास खगोल वैज्ञानिक करत होते. यामध्ये एनजीसी ७७३४ च्या केंद्रातून असामान्य उत्सर्जन आणि एनजीसी ७७३३ च्या उत्तर भागात एक गुठळीसारखा चमचमणारा तार्याचा शोध लागला. ही गुठळी एनजीसी ७७३३ च्या तुलनेत वेगळ्या गतीने पुढे सरकत आहे. तर त्याची उत्तर बाजूच्या मागे एक लहान कृष्णविवर आहे, असे शोधात निष्रन्न झाले आहे.
तिसरी आकाशगंगा
भारतीय खगोल भौतिकी संस्थेच्या पथकातील सदस्य ज्योती यादव, मोसमी दास आणि सुधांशू बर्वे तसेच कॉलेज डे फ्रान्स, चेअर गॅलेक्सी अॅट कॉस्मोलॉजी, पॅरिसच्या फ्रँकोइस कॉमबिस यांनी हा शोध घेतला. आकाशगंगा आपसात विलीन होताना महाकाय कृष्णविवरसुद्धा एकमेकांच्या जवळ येण्याची शक्यता वाढते, असे संशोधकांनी सांगितले.