कोची (केरळ) – एखादा संशयित आरोपी पीडितेच्या मांड्यांच्या मध्ये लैंगिक गैरकृत्य करत असेल तर त्यालासुद्धा भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७५ अंतर्गत बलात्कारच म्हटला जाईल, असे केरळच्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती के. विनोद चंद्रण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने २०१५ च्या एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय सुनावला. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्या दोषीने केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शेजारील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली संबंधित दोषी व्यक्तीला ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
पोटदुखत असल्यामुळे पीडितेला तिच्या आईने एका वैद्यकीय शिबिरात दाखविल्यानंतर या बाबत खुलासा झाला. त्यानंतर चाइल्ड लाइनच्या पदाधिकार्यांच्या मदतीने गुन्हा नोंदविण्यात आला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयाने संशयिताला दोषी मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षेविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यात पेनेट्रेशन (स्त्रीच्या योनीत लिंग घालायचे कृत्य) बलात्कार कसा होऊ शकतो, असा प्रश्न त्याने याचिकेत उपस्थित केला.
महिलेच्या शरिराच्या इतर भागांमध्ये पेनेट्रेशनचा सुद्धा समावेश होतो. भादंविच्या कलम ३७५ अंतर्गत योनी, युरेथ्रा (मूत्र बाहेर पडण्याचा मार्ग), एनस (गुद्दद्वार), किंवा शरीरातील कोणत्याही अशा भागात छेडछाड केल्यास त्याचा पेनेट्रेटिव्ह सेक्सुअल असॉल्टचा समावेश होतो, असे खंडपीठाने स्पष्ट केले.