इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सोमवारी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. याआधी न्यायालयात सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादात आरोपी आसाराम बापूला जन्मठेपेची मागणी केली होती. तसेच आरोपी हा सवयीचा गुन्हेगार असून त्याच्याकडून भरघोस दंडही ठोठावण्यात यावा, असेही सांगितले. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात आहे, जिथे तो एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूंना दोषी ठरवले होते. अहमदाबादमधील मोतेरा येथील आश्रमात आसाराम बापूने २००१ ते २००६ दरम्यान महिला शिष्यावर अनेकदा बलात्कार केला. फिर्यादी कोडेकर म्हणाले की, आसारामने केलेल्या गुन्ह्यात जन्मठेपेची किंवा १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे पण आसाराम हा अशाच अन्य एका प्रकरणात तुरुंगवास भोगत असून तो सवयीचा गुन्हेगार आहे, अशी मागणी आम्ही केली. अशा परिस्थितीत आसारामला कठोर शिक्षा आणि मोठा दंड ठोठावण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.
गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी आसारामविरुद्धचा खटला पूर्ण केला आणि त्याला आयपीसीच्या कलम ३७६, ३७७, ३४२, ३५४, ३५७ आणि ५०६ अंतर्गत दोषी ठरवले. महिलेच्या बलात्कार प्रकरणात आसारामची पत्नी लक्ष्मीबेन, त्यांची मुलगी आणि इतर चार शिष्यांसह सहा आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
Rape Case Asaram Bapu Sentence Gandhinagar Court