इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – बॉलीवूडमध्ये ऑन स्क्रीन अनेक लोकप्रिय जोड्या आहेत. पण रील आणि रिअल लाईफमध्ये उत्तम केमिस्ट्री असलेल्या जोड्याही आहेतच. यात अमिताभ – जया बच्चन हे नाव पहिल्या स्थानावर आहे. याच यादीत असलेलं सध्याचं हॉट आणि लोकप्रिय कपल म्हणजे रणवीर-दीपिका. ही सगळी माहिती देण्याचं कारण म्हणजे या हिट जोडीच्या खासगी आयुष्यात सगळं आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येतायत. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
दोघांनीही काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. लग्नानंतरही ही जोडी कायम चर्चेत राहिली. पण काही काळापासून दीपिका आणि रणवीर यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. एका मुलाखतीत रणवीरने मौन सोडत पती – पत्नीतील संबंध कसे आहेत यावर मनमोकळेपणे भाष्य केलं. रणवीर आणि दीपिका यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल काही दिवसांपासून सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
या दोघांच्या नात्यात दुरावा आला असून दोघंही वेगळे होण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. ही चर्चा रंगत असतानाच आता रणवीरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओने या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या व्हिडीओत रणवीर म्हणतो, आम्ही दोघे एकमेकांना भेटलो, ही देवाची कृपा आहे. २०१२ मध्ये आम्ही डेट करायला सुरुवात केली आणि आज दहा वर्षांनंतर २०२२ पर्यंत आम्ही एकमेकांना डेट करत आहोत.
रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या चर्चा केवळ अफवा असल्याचं समोर आलं आहे. एका पुरस्कार सोहोळ्यात रणवीर आणि दीपिकाचा हटके अंदाज दिसला. फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारताना रणवीरने या यशाचं सगळं श्रेय पत्नी दीपिकाला दिलं. तीच त्याची सर्वात मोठी ताकद असल्याचंही म्हटलं होतं.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचं लग्न २०१८ मध्ये झालं. त्याआधी जवळपास ६ वर्षं ते रिलेशनशिपमध्ये होते. दीपिका सध्या शाहरुख खानसह ‘पठाण’ चित्रपटासाठी काम करते आहे. याशिवाय ती हृतिकसह ‘फायटर’ हा चित्रपटही करते आहे. तर रणवीर रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे.
Ranveer Singh Deepika Padukon Married Life Dispute